Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मथुरेत बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू तर ५० हून अधिक बेशुद्ध

मथुरेत बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू तर ५० हून अधिक बेशुद्ध


मथुरा: संपूर्ण भारतात जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अशातच उत्तर प्रदेशमधील जिल्ह्यातून एक वाइट बातमी समोर आली आहे. येथील प्रसिद्ध ठाकूर मंदिरात रात्री उशिरा चेंगराचेंगरी झाली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. बांके बिहारी मंदिरात भाविक मंगला आरतीसाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. गर्दी इतकी जास्त होती की ५० हून अधिक भाविक बेशुद्ध झाले आणि खाली कोसळले. पोलिस अधिक्षक अभिषेक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार गर्दी जास्त झाल्याने ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये नोएडा येथील निर्मला देवी आणि जबलपूर येथील वृंदावन वासी राजकुमार यांचा समावेश आहे. 

वाचा- मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी VIP लोकांना दर्शनासाठी विशेष सुविधा दिली आहे. एका भाविकाने सांगितले की, वरिष्ठ पोलिस अधिकारी स्वत:च्या आईला घेऊन आले होते. तर मथुरा रिफायनरीचे एक मोठे पोलिस अधिकारी त्याच्या सात नातेवाईकांसोबत आरतीसाठी पोहोचले होते. हे सर्वजण बाल्कनीतून दर्शन घेत होते आणि त्यांच्या सुरक्षेसाठी छतावर जाणारे गेट बंद करण्यात आले होते. वाचा- रात्री दोन वाजता मंदिरात आरती सुरू होणार होती. त्याआधी इतकी गर्दी झाली की त्यामुळे काही भाविक बेशुद्ध झाले. हा सर्व गोंधळ सुरू असताना पोलिस प्रशासनाने अधिक कुटुंबीयांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याचा दावा करण्यात येत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.