Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा

महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा


राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता  व नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. 

यात्रेचे 3 टप्पे - 

१.

तालुकस्तरीय प्रचार व प्रबोधन  (Taluka Level Promotion & Mobilisation)

यात्रेबाबतची संपूर्ण माहिती, नावीन्यपूर्ण संकल्पना, त्याचे इतर पैलू याबाबतची माहिती देण्यात येणार. नावीन्यपूर्ण कल्पना असलेले नागरिक आपल्या कल्पना यावेळी नोंदवू शकतात.

२.

जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा  (District Level Bootcamp & Pitching Competition)

प्रशिक्षण शिबिरात नवउद्योजकतेबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजक व  तज्ज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्याने होणार आहेत. तसेच नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पनांची सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यात एकूण ५४ जिल्हास्तरीय सत्रे होणार आहेत. (मोठ्या जिल्ह्यात २ सत्रे). जिल्हास्तरावर सर्वोत्तम कल्पना सादर करणार्‍यांना २५,००० रुपयांपर्यंतचे पारितोषिक मिळणार. 

३.

राज्यस्तरीय सादरीकरण स्पर्धा व विजेत्यांची घोषणा (State Level Pitching Competition & Announcement of Winners)

प्रत्येक जिल्हा सादरीकरण सत्रातील उत्तम १० कल्पनांचे (एकूण ५४० कल्पंनाचे) राज्यस्तरीय सादरीकरण तज्ज्ञ समितीसमोर करण्यात येणार आहे.  राज्यस्तरीय विजेत्यांना १ लाख रुपयांपर्यंतचे रोख अनुदान तसेच आवश्यक पाठबळही पुरविण्यात येतील.

यात्रेचा शुभारंभ १५ ऑगस्ट २०२२ रोजी होणार असून अधिक माहितीसाठी व  सहभाग नोंदविण्यासाठी www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in वर भेट द्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.