Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गणेशोत्सव तयारीबाबत महापालिकेकडून मंगळवारी बैठकीचे आयोजन

गणेशोत्सव तयारीबाबत महापालिकेकडून मंगळवारी बैठकीचे आयोजन


सांगली:  सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून उद्या मंगळवार दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी आगामी गणेशोत्सव तयारीबाबत महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली आणि मिरजेत गणेश मंडळांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

सदर बैठक आयुक्त सुनील पवार यांच्या उपस्थितीत होणार असून बैठकीस मनपा पदाधिकारी, नगरसेवक, पोलीस, वाहतूक शाखा, वीज मंडळ प्रतिनिधी यांची उपस्थिती असणार आहे. सदर बैठक मंगळवार 23 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता मिरज आणि कुपवाड मधील गणेश मंडळांसाठी मिरज विभागीय कार्यालय मिरज येथे तर सांगलीतील प्रभाग 1 आणि 2 साठी दुपारी 3 वाजता मनपा मुख्यालय सांगली येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीस मनपा क्षेत्रातील गणेश मंडळ प्रतिनिधीनी उपस्थित राहावे असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात  येत आहे.

पहिल्याच दिवशी 39 मंडळांनी मागितली परवानगी

यंदाच्या गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळांना सुलभतेने परवाना मिळावा यासाठी महापालिका प्रशासनाकडून आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या सूचनेनुसार एक ऍप विकसित करण्यात आले आहे. या ऑनलाईन ऍपमध्ये एकाच ठिकाणी सर्व परवानग्या देण्याची व्यवस्था आहे. सोमवारी हे ऍप गणेश मंडळांसाठी खुले केल्यानंतर पहिल्याच दिवशी 39 गणेश मंडळांनी स्टेज परवान्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज दाखल केले आहेत अशी माहिती सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते यांनी दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.