Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हरिहरेश्वर इथं सापडलेल्या बोटीतील फ्रीजमध्ये....

हरिहरेश्वर इथं सापडलेल्या बोटीतील फ्रीजमध्ये....


सिंधुदुर्ग, 21 ऑगस्ट : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर  दोन संशयास्पद बोटी सापडल्या. या बोटीवर शस्त्र सुद्धा सापडली होती. पण या प्रकरणाचे गुढ अजूनही कायम आहे. जी दुसरी बोट सापडली, त्या बोटीवरील फ्रीजमध्ये जेवणाचे सामान मिळाले ते कुजलेले नव्हते याचा अर्थ काहीवेळा पूर्वीच बोटीवरून ते खाऊन पिऊन गेले होते, असा खळबळजनक दावा भाजपचे नेते निलेश राणे यांनी केला आहे. 18 ऑगस्ट 2022 रोजी एके-47 रायफल आणि इतर शस्त्रांचा साठा असलेली बोट रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्याजवळ आढळली होती. या बोट प्रकरणी निलेश राणे यांनी नवीन खुलासा केला आहे.

हरिहरेश्वर मध्ये मिळालेली बोट नेमकी इथे कशी आली. त्या बोटीवर कोण होतं. याबाबत अजून स्पष्टता नाही. ही फार गंभीर बाब आहे. त्या बोटीमध्ये काही हत्यारं सापडली. त्या बोटीमधील फ्रीजमध्ये अन्न हे ताजे होते. कुजलेले नव्हते. काही वेळापूर्वीच तिथून खाऊन पिऊन निघून गेले. कोण होतं किती होते, याची काहीच कल्पना नाही. 'मला परत परत संशय येतोय की ते गेले कुठे?कसे गेले?काही अधिकाऱ्यांना निलंबित करून कोणी हे प्रकरण हलक्यात घेऊ नये. सरकारने याची गंभीरपणे दखल घ्यावी' अशी मागणी निलेश राणे यांनी केली. 

'रायगड जिल्ह्यामध्ये हरिहरेश्वरमध्ये बोट सापडली आहे.

त्या बोटीवर कोण होते, त्यांच्याकडे काही सामान होते का, ते तिथून कुठे गेले, याबद्दल कोणतीही माहिती नाही. हे फार गंभीरबाब आहे. 26/11 चा हल्ला झाला होता, त्यावेळी सुद्धा दहशतवादी असेच आले होते आणि त्यांनी हल्ला घडवला होता, अशी भीती राणेंनी व्यक्त केली. 'सरकारने गंभीरतेने या विषयाकडे लक्ष द्यावे.

26/11 सारखा प्रकार देशात घडू नये, मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये घडून याची दखल सरकारने घ्यावी. ते इथंपर्यंत कसे आले, खवळलेल्या समुद्रातून ते इथंवर कसे आले? उद्या असं काही झालं तर आपण सहन करू शकणार नाही, त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा असं फेल्युअर होऊ नये याची दक्षता घ्यावी. जे कुणी पळून गेले आहे त्यांना पकडलं पाहिजे. त्या पकडलेल्या लोकांना महाराष्ट्रासमोर हजर केले पाहिजे, अशी मागणीही निलेश राणेंनी केली.

बोटीमध्ये सापडली एके 47 रायफल्स आणि चॉपर दरम्यान, घातपाताचा संशय असल्याने या प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे देण्यात आला आहे. रायगढ संशयित बोट प्रकरणी ATS ने मोठी माहिती दिली आहे. बोटीमध्ये 2 तलवार आणि 2 चॉपरही मिळाले आहेत. 3 AK47 आणि काडतूसं मिळाल्याचं पोलीसांनी सांगितलेलं.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बोट आली कशी याचा तपास सुरू आहे. फुगा बोटही सापडली त्याचा आणि या बोटीचं काही कनेक्शन आहे का? या बोटीतून काही जण किनाऱ्यावर पळून गेल्याचा संशयही आहे. त्या अनुषंगाने चौकशी सुरू आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.