Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीतील लॉजमध्ये तरुणीचा गळफास

 सांगलीतील लॉजमध्ये तरुणीचा गळफास


सांगली : सांगली शहरातील एका लॉजमध्ये तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अस्मिता पाटील असे या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तिच्यासोबत रुममध्ये असणाऱ्या मित्राला संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही नेमकी आत्महत्या आहे, की हत्या? या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. संशयित तरुण हा निवृत्त पोलिसाचा मुलगा आहे. सांगली शहरातल्या कोल्हापूर रोडवर असणाऱ्या एका लॉजमध्ये हा प्रकार घडला. शनिवारी सकाळी तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. अस्मिता पाटील असे या तरुणीचं नाव आहे. 

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अस्मिता आणि तिचा मित्र हे दोघे जण लॉजमध्ये आले होते. मात्र शनिवारी सकाळच्या सुमारास अस्मिता हिचा मृतदेह छताला लटकत असल्याचं आढळून आलं आहे. या घटनेची माहिती मिळतात शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे, त्याचबरोबर या प्रकरणी संशयित म्हणून मित्राला ताब्यात घेण्यात आले आहे.

आत्महत्येच्या वेळी आपण बाथरुममध्ये गेलो होतो, मात्र बाहेर आल्यावर अस्मिता छताला लटकत असल्याचं आढळून आल्याचं त्याने सांगितलं आहे. अस्मिताचा मृतदेह हा शवविच्छेदन करण्यासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे.  प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं दिसून येत आहे. तरी ही हत्या आहे का? या दृष्टीने शहर पोलीस तपास करत आहेत. तर संशयित तरुण हा एका निवृत्त पोलिसाचा मुलगा असल्याची माहिती आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.