Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्वातंत्र्य दिनी मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

स्वातंत्र्य दिनी मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण 


सांगली, दि. 12,  : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनी सोमवार, दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9.05 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणावर होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

या समारंभास खासदार, आमदार, स्वातंत्र्य सैनिक, जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, स्थानिक राजकीय पक्षाचे प्रमुख, शहिद जवानांचे कुटुंबिय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, स्थानिक शासकीय अधिकारी आणि प्रमुख नागरीक यांनी मुख्य शासकीय समारंभास वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

विजयनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणावर दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण होणार आहे. या दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 या वेळेत इतर कोणत्याही संस्थेने, शासकीय, निमशासकीय कार्यालयाने ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करू नये. एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ या दिवशी सकाळी 8.35 च्या पूर्वी किंवा 9.35 च्या नंतर करावा. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाचा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न करावयाचा आहे. सुरक्षित वावराच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे व अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा यासाठी वेबसाईटव्दारे होणारे थेट प्रक्षेपण पहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ध्वजारोहणाचा समारंभ सुरु होण्यापूर्वी 15 मिनिटे आसनस्थ व्हावे व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.