Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सर्दी, तापावरील औषधांवर केंद्र सरकार लवकरच बंदी घालण्याची शक्यता

 सर्दी, तापावरील औषधांवर केंद्र सरकार लवकरच बंदी घालण्याची शक्यता


सर्दी, ताप यासाठी असलेल्या टॅब्लेट, कफ सिरप यासाठी आपण घेत असलेल्या डी कोल्ड टोटल, विक्स अॅक्शन ५०० अ‍ॅडव्हान्ससह १९ औषधांवर केंद्र सरकार लवकरच बंदी घालण्याची शक्यता आहे. अशा सिरप किंवा टॅब्लेटमध्ये एकापेक्षा जास्त औषधे असतात. त्यांना फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशन (FDCs) म्हणतात. सामान्य भाषेत याला कॉकटेल औषध असेही म्हणतात. विकसित देशांमध्ये एकापेक्षा जास्त औषधांचे मिश्रण करून तयार केलेल्या औषधांच्या विक्रीवर बंदी आहे. आता भारताने अशा १९ सिरप आणि गोळ्यांची यादी तयार केली असून त्यांच्यावर लवकरच बंदी घातली जाऊ शकते.

डॉ. एम.एस. भाटिया, प्राध्यापक आणि प्रमुख, मानसोपचार विभाग, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने केंद्रीय औषध मानक आणि नियंत्रण संघटनेकडून १९ एफडीसीची यादी तयार केली. ही यादी आता आरोग्य मंत्रालयाला देण्यात आली असल्याने त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.