Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवणार : कामांचा ऍक्शन प्लॅन बनविणार

विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवणार : कामांचा ऍक्शन प्लॅन बनविणार 


: महत्वाची कामे पहिल्यांदा हाती घेणार : नूतन आयुक्त सुनील पवार यांची नगरसेवकांना ग्वाही :  स्थायी समिती सदस्य आणि नगरसेवकाकडून नूतन आयुक्त सुनील पवार यांचे स्वागत: स्थायी सभेनंतर आयुक्त पवार यांचा सत्कार


सांगली : महापालिकेत आयुक्त म्हणून काम करत असताना विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवुन महत्वाच्या कामांचा ऍक्शन प्लॅन बनविणार आहे. अशा एक्शन प्लॅन नुसार महत्वाची विकासकामे पहिल्यांदा हाती घेणार असल्याची ग्वाही नूतन आयुक्त सुनील पवार यांनी मनपा नगरसेवकांना दिली.

स्थायी समिती सदस्य आणि नगरसेवकाकडून नूतन आयुक्त सुनील पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी स्थायी सभापती निरंजन आवटी आणि सर्वच स्थायी सदस्य महिला नगरसेविका यानी सभेनंतर आयुक्त सुनील पवार यांचा सत्कार सत्कार करीत स्वागत केले.  यावेळी नगरसेवक पदाधिकारी यांची उपस्थिती होती.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.