Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एकनाथजी, मुंबईचे रस्ते काँक्रिटचे करा, पण...

 एकनाथजी, मुंबईचे रस्ते काँक्रिटचे करा, पण...


‘मुंबईतील  सगळे रस्ते काँक्रिटचे करणार’ अशी घोषणा एकनाथमहाराज शिंदे यांनी विधानसभेत केली आहे.  गेले २-३ महिने मुंबईचे रस्ते खड्ड्यांमुळे देशात गाजत आहेत. हे  ‘गाजणे’  मुंबईची बदनामी करणारे आहे. काँक्रिटचे रस्ते करण्याची घोषणा झाली, पण डांबराचे रस्ते का उखडले? याची चौकशी आता कधीच होणार नाही. सामान्य माणसांच्या करातून हे रस्ते तयार झाले. ठेकेदारांनी कोट्यवधी रुपये त्यात कमावले. एका पावसाने रस्त्याची धूळधाण झाली. पाऊस याला कारणीभूत नाही. खड्डे पडण्याला ठेकेदारच जबाबदार आहेत. त्यांना द्यावी लागणारी टक्केवारी जबाबदार आहे. हे उघड सत्य आहे. याची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही. खड्डे का पडले? त्याबद्दलची जबाबदारी निश्िचत केली जात नाही. कोणावरही दुय्यम दर्जाच्या कामाचा खटला भरला जात नाही. एकनाथजी शिंदे यांना हे प्रकार मािहती नाहीत, असे अिजबात नाही. त्यांच्याकडेच ते खाते पूर्वी होते. आताही आहे. पाऊस हे खड्डे पडण्याचे कारण नाही. एकनाथ शिंदे यांनी ‘कागल ते ित्रवेंद्रम’ असाही एकदा प्रवास करावा. आणि तो मोटारीने करावा. तिथे पाऊ किती पडतो ते पहावे. ितथे डांबराचे रस्ते कसे आहेत, त्याची एकदा मािहती घ्या आिण मग हे लक्षात येईल की, मुंबईतील खड्डे हे टक्केवारीचे खड्डे आहेत. 

मुंबईतील रस्त्यांची जबाबदारी एम. एम. आर. डी. ए. वर आहे.  मुंबईतील २७ उड्डाणपूल एम. एस. अार. डी. सी. कडे आहेत. काँक्रिटचे रस्ते जरूर करा. पण आपण करोडो रुपये खर्च करून डांबराचे रस्ते बनवले होते, त्याची धूळधाण का झाली? कोणी केली? बांधकामाचे निकष न पाळणारे ठेकेदार कोण? हे एकदा लोकांसमोर येऊ द्या. त्यांची नावे काळ्या यादीत जाहीर करा. कठोर भूमिका घेतल्याशिवाय ही टक्केवारी बंद होणार नाही.  लाल किल्ल्यावरून पंतप्रधान ७५ व्या स्वातंत्र्यादिनी भ्रष्टाचाराबद्दल बोलतात. मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे हे त्याच भ्रष्टाचाराचे प्रतिक आहे. 

आता नव्याने काँक्रिटचे रस्ते होणार... ही घोषणा आहे. त्याची तयारी नेमकी काय? अर्थसंकल्पात तरतूद आहे का? एम. एम. अार. डी. ए. कडे किमान ५००० कोटी रुपयांचा निधी आहे का? कशाचा काही पत्ता नाही. मुंबईचे रस्ते काँक्रिट करणे हा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. पण, हे करणे िकती कठीण आहे, याची कल्पना असायला हवी. समृद्धी महामार्ग करणे सोपे आहे.... कारण ितथे वाहतूक नाही. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे करताना तो करणे सोपे होते... कारण शेडूंग ते खालापूर पहिला टप्पा करायला वाहतूक नव्हती. तरीही तीन वर्ष लागली. १९९५ ते १९९८ एवढा काळ पहिल्या टप्प्याला लागला. 

मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करताना एकमार्गी वाहतूक करावी लागेल. सध्याच मेट्रोच्या कामामुळे मुंबईच्या वाहतुकीचे तीन-तेरा झालेले आहेत. ठाण्याहून मुंबईत जायला ३ तास लागतात. याचा अनुभव मुंख्यमंत्री घेत असतील. ठाण्याहून कांदिवली-मालाड, बोरिवलीला जायला तीन तास लागतात.  मुंबईच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणार म्हणजे प्रामुख्याने तीन रस्ते.... १) सायन ते घोडबंदर रोडपर्यंत. २) वांद्रे ते दहिसरपर्यंत हे दोन मुख्य रस्ते. त्यानंतर जुना आग्रा रोड आणि पश्चिमेकडील विवेकानंद रस्ता... या सगळ्याच रस्त्याची धूळधाण आहे. हे चार महत्त्वाचे रस्ते काँक्रिटीकरण करायचे म्हटले तर जवळपास १५० किलोमीटरचा रस्ता ६ पदरी लेनमध्ये करण्याकरिता किती वर्षे लागतील? एकतर्फी रस्त्याचे काम करायचे तर वाहतुकीची होणारी कोंडी मुंबईचे जनजीवन उद्धवस्त करून टाकील. या रस्त्याचे काम दिवसा करणे शक्य नाही. सध्याच्या रस्त्यांच्या खाली ‘जीओ’ च्या केबल लाईन्स, गॅसच्या पाईप्ालाईन्स, महावितरणच्या केबल्स, नळाचे पाईप, गटारे अशा अनेक अडचणींवर मात करून हा रस्ता करायचा आहे. डांबरी रस्ता खोदून हे काम करता येणे सोपे असते. पुन्हा तेवढ्यापुरता रस्ता तयार करता येतो. काँक्रिट करताना हे शक्य नाही. शिवाय एकाबाजूने वाहतूक चालू राहणार... ती दुतर्फा असणार.... काय हालत होईल, याची कल्पना करा... हे काल्पनिक भय नाही. एखादी घोषणा केल्यानंतर पर्यायी व्यवस्थेचा विचार व्हायलाच हवा. कारण या १५० किलोमीटर काँक्रिट रस्त्यांसाठी किमान ५ वर्षे जातील, हे लिहून ठेवा. या पाच वर्षांत मुंबईच्या रस्त्यावर किमान ५ लाख नव्या गाड्या आलेल्या असतील, त्या कुठे चालणार? गेल्या वर्षी पूर्व-पश्चिम उपनगरांत एक लाख नव्या गाड्या रस्त्यावर आल्या. आता हिशोब लावा....  तज्ञाांशी चर्चा करा. पूर्वीचे अनुभव बघा... मुंबईच्या रस्त्यावरचा ट्रॅफिक बघा...   आज मुंबई बेटापेक्षा (कुलाबा ते सायन) पूर्व-पश्चिम उपनगरांची लोकसंख्या मुंबई बेटाच्या दुप्पट आहे. मुंबईतील गाड्यांच्या दुप्पट उपनगरांत गाड्या आहेत. ८ लाख रिक्षा आहेत. मुंबई बाहेर जाणारी अवजड वाहतूक याच रस्त्याने होत आहे. या सर्वांतून मार्ग काढून काँक्रिटचा रस्ता बनवण्याकरिता रात्री १२ ते पहाटे ५ एवढाच वेळ मिळेल. शिवाय तुमचा १०० मीटरचा रस्ता तयार झाला रे झाला की त्यावर पार्किंग झालेच म्हणून समजा. डोंबिवली ते शिळफाटा २१ किलोमीटरचे अंतर होते... हा रस्ता करायला एम. एस. आर. डी. सी. ला तीन वर्षे लागली. 

मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना याची कल्पना असेल की, कोकणातील चौपदरी रस्त्यांची हालत काय आहे? १९५२ साली बाळासाहेब देसाई बांधकाम मंत्री असताना जसे कोयना धरणाचे काम सुरू झाले (तेव्हा बांधकाम खात्यातच पाटबंधारे खाते होते. ) तसेच मुंबई- सावंतवाडी हा ५१३ किलोमीटरचा एकेरी मार्ग (सिंगल वे) काँक्रिटीकरण करण्यात आले. तो रस्ता ३० वर्षे टिकला. कोकणातील चौपदरी नव्या रस्त्याची घोषणा १९९५-९६ सालात झाली होती. जेव्हा सेना- भाजपा युतीचे सरकार आले हाेते. आता वर्षे झाली सत्तावीस. या सत्तावीस वर्षांत या रस्त्यांचे काय झाले? रत्नागिरी ते वडखळपर्यंत रस्ता झाला का? सिंधुदुर्गातील रस्ता काही प्रमाणात झाला आहे... तो नारायण राणे त्यावेळी मुख्यमंत्री आणि नंतर काँग्रेसमध्ये  आल्यावर मंत्री असल्यामुळे त्यांच्या दणक्याने त्या जिल्ह्यात बऱ्यापैकी चौपदीकरण झाले. पण, रत्नागिरी ते वडखळ काम अजून रखडलेले आहे. शिवाय हा रस्ता काँक्रिट नाही. डांबरीकरण आहे. या रस्त्याचे दोन ठेकेदार एक सुप्रिम काँन्ट्रॅक्टर यांना काळ्या यादीत टाकावे लागले. दुसरे दिलीप बिल्डकॉन यांचे काय झाले? यांनी किती चुना लावला? हे जगजाहीर आहे. हा रस्ता नॅशनल हायवे अॅथॉरिटीकडे आहे. तरीही रखडलेला आहे. 

मुंबईचे रस्ते काँकि्रट करताना वाहतुकीच्या दृष्टीने जे काही हाल होणार आहेत त्याची नुसती कल्पना केली तरी थरकाप होतो... मुंबईत आज मेट्रो आली. घाटकोपर ते अंधेरी ही मेट्रो सोडली तर सध्या दहीसर ते आरे काॅलनी धावणारी मेट्रो िरकामी धावते. सरकते जिने बंद आहेत. तरुणांची गोष्ट सोडा.... मुंख्यमंत्रीसाहेब, तुमच्या वयाच्या माणसालाही त्या मेट्रोचे जिने चढून जाणे शक्य होणार नाही... माझ्या पिढीला तर शक्यच नाही.... पार्किंगची काही व्यवस्था नाही. मेट्रो ट्रेन रिकाम्या का धावत आहेत? याची कोणाला फिकीर नाही. करोडो रुपयांची गुंतवणूक ‘शो-पीस’ झालेली आहे.  प्रत्येक स्टेशनच्या आजुबाजूला जिथपर्यंत बाईक किंवा चारचाकी पार्किंगची व्यवस्था होत नाही, तिथपर्यंत घरातून रिक्षाने निघून जिने चढून प्रवासी जाणार नाहीत. नागपूरला ‘सीताबर्डी ते नागपूर विमानतळ’ मेट्रो धावते आहे.... सगळे डब्बे रिकामे.... मेट्रो झाली एवढ्यातच सगळे खूष आहेत. तिची उपयुक्तता किती? याचा आढावा कुणी घेत नाही. मेट्रोतर्फे जाहीर करण्यात आले आहे की, ‘ही वाहतुक व्यवस्था तोट्यात आहे’.  तोट्यातच जाणार.... मेट्रोचा उपयोग कमीच.... पण, आजच्या रस्ते वाहतुकीला मेट्रोच्ाा पसारा आणि अडवलेला रस्ता, यामुळे वाहतूक कोंडी किती झाली.... इंधन खर्च किती वाढला आहे? त्यावर कोणी मार्ग काढत नाही.... ऐरोलीहून पवईमार्गे जोगेश्वरीला जाऊन बघा.... अंतर अाहे, १५ किलोमीटर.... किमान २ तास.... पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरमध्येच गाडी चालवावी लागते. हे राेजचे चाललेले आहे. तुम्ही काँक्रिटचे रस्ते करायला घेतले तर उपनगरातील माणूस संध्याकाळी मुंबईहून निघाला तर, कांदीवली-बोरिवली गाठायला त्याला पहाट होईल. आजची स्थिती अशी आहे की, संध्याकाळी ५.३० / ६.०० नंतर मुंबईतून शहीद भगतसिंग मार्गावरून निघाले  तर मुक्तमार्गाला ( फ्री वे) पोहोचेपर्यंत ४० मिनीटे लागतात. घाटकोपरला पोहोचायला ४० मिनीटे. तिथून कोपरीपर्यंत १ तास लागतो. कोपरी ते कॅडबरी किती अंतर आहे? मुख्यमंत्रीसाहेबांना मािहती आहे. ते लुईसवाडीतच राहतात. अर्धातासाच्या वर रोजचा वेळ लागतो. रस्ते वाहतुकीला शिस्त राहिलेली नाही. शिवाय वाहतूक एवढी वाढली आहे... उलट्या बाजूने येणारी वाहने लाईट लावून येतात. त्यांना हटकले तर.... ‘तुझ्या बापाच्ाा रस्ता अाहे का?’ असे म्हणतात. आर.टी.ओ किंवा वाहतुक पोलीस या उलट्या वाहतुकीला रोखत नाहीत. अर्थात वाहतुक पोलिसांवर कमालीचा ताण पडलेला आहे, हे मान्यच करायला हवे. हा वाहतुक पोलीस एक दिवस बाजुला झाला तर मुंबईचा रस्त्यावरील  धिंगाणा विधानसभेतील पायंड्यांवरच्या िधंगण्यापेक्षा भयानक होईल. 

 दोन्ही पूर्व-पशि्चम उपनगरात दोन टोके गाठताना चार-चार/पाच-पाच तासांचा प्रवास दिवसभरात होतो. रुग्ण, वृद्ध, गरोदर महिला, कष्टकरी स्त्रिया, विद्यार्थी यांचे जे काही हाल होतात त्याला सीमा नाही... त्याची कुणाला पर्वा नाही... 

एक प्रसंग मुद्दाम सांगतो... एक महिना झाला.... बिहार, बंगाल, त्रिपुराचे माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील यांना  घेऊन मलाड येथील पाराशर हिलिंग सेंटरमध्ये अॅस्टिओपॅथी उपचाराकरिता जात होतो.... १२.३० ला वरळीहून आम्ही िनघालो. सागरी सेतूवरून वांद्र्याला पश्चिम महामार्गावर येईपर्यंत १० मिनीटांत आलो. तिथे वाहतूक थांबवण्यात आली. तिथून सांताक्रूझपर्यंत  जायला दीड तास लागला. पुन्हा वाहतूक थांबवण्यात आली. तेव्हा २.३० वाजले होते. मलाड गाठायचे होते... माजी राज्यपालांचे वय ८६.... माझ्या नाडीचे ठोके वाढत गेले... वाहतूक विभागाच्या अिधकाऱ्यांना फोन केले... वाहतूक कोंडीचे कारण सांगायला कोणीही तयार नव्हता... अंधेरी विभागाच्या डीसीपींना विचारण्यात आले... त्यांनी सांिगतले की, ‘मालदिवचे प्रेसिडेंट आरे कॉलनी पहायला आले आहेत.. त्यामुळे वाहतूक थांबवली आहे....’ जगात असे कुठेही होत नाही... मलाडपासून सांताक्रूझपर्यंत १० किलोमीटरची लांबच लांब वाहनांची रांग लागलेली होती... २ वाजले... तीन वाजले... चार वाजले.... डी. वाय. दादा शांतपणे बसून होते... ७ वाजता मालाडला पोहोचलो. वरळी ते मालाड ७ तासांचा प्रवास झाला. नंतर उपचार.... त्यांना परत वरळीला पोहोचायला रात्री ११ वाजले. या संपूर्ण वाहतूक कोंडीत हजारो माणसं ७-८ तास अडकली. वाहतूक कोंडी का केली, हे कारण कोणालाही मािहती नाही. एका राष्ट्राच्या अध्यक्षासाठी लाखो प्रवाशांना वेठीला धरले... उद्या... काँक्रिटचे रस्ते जरूर करा.... पण  ते करताना या मुंबईच्या वाहतुकीचे तीन-तेरा वाजू नयेत.... याची काय काळजी घेणार....? उल्ाट्या बाजूने येणाऱ्या वाहनांवर काय कारवाई करणार? कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सध्या मिळत नाही.... मध्यमवयाच्या माणसाला लोकलमध्ये शिरणे अशक्य आहे. शिवाय तुमचे सगळे उड्डाणपूल चारचाकी वाल्यांकरिता आहेत... मुंबईतील २७ उड्डाणपुलांपैकी किती पूलांवर दुचाकी, रिक्षावाले, बैलगाडीवाले, पादचारी यांना परवानगी आहे?  चारचाकी वाल्यांकरिता उड्डाणपूल सर्रास होत आहेत. पण, कोणाही नेत्याच्या विकास कार्यक्रमात दुचाकीवाल्यांकरिता, रिक्षावाल्यांकरिता उड्डाणपूल बांधावा, असा निर्णय कधीही होत नाही. तशी योजनाही नाही. लाड  फक्त गाडीवाल्यांचे आहेत. पैसेवाल्यांचे आहेत...  रिक्षाने फिरणारी माणसे वाहतूक कोंडीत मरेनात का?  त्याचे कोणाला काय पडले आहे? गाडीवाल्यांची सोय झाली पाहिजे.... मुख्यमंत्रीसाहेब, तुमच्या कठीण काळात तुम्ही रिक्षा चालवली... मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलात.... अिभमानाची गोष्ट आहे... पण, कष्टकऱ्यांकरिता एखादा उड्डाणपूल असावा, त्या पुलावरून चारचाकीवाल्यांना बंदी असावी, असा एखादा िनर्णय करा ना.... काँक्रिटचे रस्ते जरूर करा.... पण, या मुंबईला वाहतूक कोंडीतून कधी मुक्त करणार, ते आगोदर सांगा.... १०-२० वर्षांनी अशी  वेळ येईल की, दक्षिण मुंबईतील अर्धी कार्यालये रात्री ८ ते पहाटे ४ पर्यंत चालवावी लागतील.... नाहीतर उपनगरातून सकाळी निघालेला माणूस मुंबईत पोहोचायला १२ तास लागतील... मुख्यमंत्रीसाहेबांना आणखी एक सांगणे आहे... पूर्व-पश्चिम उपनगरातून एकदा प्रवास करा.... तुमच्या नजरेच्या टप्प्यात डाव्या आणि उजव्या हाताला जेवढ्या नवीन इमारती आकाशाला भिडत आहेत, त्या मोजा.... त्याच्यामध्ये एकूण फ्लॅट किती आहेत.... त्याची गिनती करायला तुमच्या पी. एस. ला सांगा... त्या नवीन उभ्या राहणाऱ्या इमारतीत एकूण फ्लॅट किती आणि नंतर त्या इमारतीत गाड्या किती येणार, ते गणित करा.... या सगळ्या गाड्या पूर्व-पश्चिम उपनगरांच्या रस्त्यावर दोन वर्षांत उतरणार.... यातील अर्ध्या इमारती अशा आहेत की, त्या इमारतीतून गाडी बाहेर पडताना... खालून मुंबईकडे येणारी वाहतूक थांबवावी लागेल. त्यामुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीची कल्पनाही करता येणार नाही... या इमारतींना परवानग्ाी कशी मिळाली, याची चर्चा आता व्यर्थ आहे... पण, पुढच्या पाच-दहा वर्षांत पूर्व-पश्चिम उपनगरांतून मुंबईला येताना िकमान १० तास बाजूला काढून ठेवा.... मी ६३ वर्षांपूर्वी मुंबईत आलो. तेव्हा शेवटची बोरिवली लोकल संध्याकाळी ७.३० ला होती. पार्ल्याला जवळपास सगळी लोकल खाली व्हायची. गोरेगावला उतरणारे थोडे... बोरिवलिला तर आणखीन थोडे... ग्रामीण भागातील रोजगार कमी झाले... शेती परवडेनासी झाली. मुंबईत रोजगार आहे... म्हणून मुंबई फुगली...  मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही काय अन मी काय... आपण सगळीच रोजगाराकरिताच मुंबईत आलो. त्यामुळे मुंबई अफाट वाढली. त्याचा आपण सगळे हिस्सा आहोत. पण या वाढीला ना आकार ना उकार.... नगरविकास खाते ज्यांच्या ज्यांच्याकडे होते.... ते सगळेच याला जबाबदार आहेत. मुंबईचे रूप अक्राळ-विक्राळ झाले... त्यातून बिल्डरलॉबीत गुन्हेगारी वृत्ती शिरली. बेकायदा बांधकामे झाली... अफाट पैशांनी सगळे अनुकूल करून घेता येते... हा मार्ग सोपा झाला.... सामान्य माणूस या सगळ्याखाली िचरडला गेला. हे वास्तव, कुणाला अावडो न आवडो, खोडून काढता येणार नाही.... त्या यशवंतराव मोहिते यांचे मुंबईवर मोठे उपकार झाले... ते गृहनिर्माण मंत्री असताना त्यांनी मुंबईतील श्रमिकांच्या ५०० चाळी ‘घर दुरुस्ती मंडळामार्फत’ नव्याने उभ्या केल्या. म्हणून आज मध्य मुंबईत गरिब मराठी माणूस औषधापुरता आहे. नाहीतर सगळी मुंबई ओसवाल टॉवरखाली चिरडली  गेली असती. उपनगरे का वाढली, याची ही कारणे आहेत.  नवी मुंबई का वसवावी लागली, आता आणखीन एक मुंबई करावी लागेल. अशी िस्थती आहे.... 

हे सर्व लिहिण्यामागचा उद्देश तुमच्या विकास कामाला विरोध करण्याचा नाही.... काँक्रिटचे रस्ते केलेत तर उत्तम आहे.... एम. एम. आर. डी. ए. त्याकरिता सक्षम आहे... पण, वाहतुकीचे पूर्व नियोजन करून हे करावे लागेल. अन्यथा पुढच्या पाच वर्षांत उपनगरवासियांच्या होणाऱ्या हालाला कुत्रंही विचारणार नाही.... नको तो विकास... असे म्हणायची वेळ न येवो.... म्हणजे िमळवले.... अर्थात पाच वर्षांनंतर होणारे तुमचे काँक्रिटचे रस्ते पहायला मी बहुधा नसेनच... 

पण, तरीही.... सध्या एवढेच.... 


- मधुकर भावे


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.