पक्षकारांनी फिरते लोक न्यायालय व कायदे विषयक शिबीराचा लाभ घ्यावा - प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अजेय राजंदेकर
सांगली दि. 8 : सांगली जिल्ह्यामध्ये फिरते लोकन्यायालय दिनांक 8 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले आहे. फिरते लोक न्यायालय व कायदे विषयक शिबीर प्रत्येक तालुक्यामध्ये दोन दिवस आयोजित करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त पक्षकारांनी या योजनेचा लाभ घ्यावा व आपआपसातील वाद समझोत्याने व सामोपचाराने मिटवावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अजेय राजंदेकर यांनी केले.
राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या न्याय आपल्या दारी या योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या फिरते लोकअदालतचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अजेय राजंदेकर यांच्याहस्ते झाले. यावेळी त्यांनी मोबईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून तालुक्याच्या ठिकाणी फिरते लोकअदालतची व्हॅन रवाना करण्यात आली. हा कार्यक्रम जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव प्रविण कि. नरडेले यांच्या मार्गदर्शनात पार पडला.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अजेय राजंदेकर व फिरते लोक न्यायालयाचे पॅनेल प्रमुख एस. ए. उपाध्ये यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश आर. के. मलाबादे, एस आर भदगले, पी. बी. जाधव, आर एन माजगांवकर, एस. पी. पोळ, मुख्य न्यायदंडाधिकारी पी.पी. केस्तीकर व इतर सर्व न्यायीक अधिकारी, वकील बार संघटनेचे पदाधिकारी तसेच जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक व्ही. व्ही. कुलकर्णी तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.