Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नेत्रदानासाठी समाजामध्ये जनजागृती करा - अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर

 नेत्रदानासाठी समाजामध्ये जनजागृती करा - अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर


सांगली, दि. 26,  :  नेत्रदान पंधरवडा दि. 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2022 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या नेत्रदान पंधरवड्याचे घोषवाक्य 'तुमचे डोळे जगू द्या' हे आहे. नेत्रदान पंधरवड्यानिमित्त पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी नेत्रदानाचे महत्व व नेत्रदानाबद्दल असलेल्या अंधश्रध्दाबाबतची माहिती दिली. तसेच नेत्रदानासाठी समाजामध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, डॉ. गायत्री खोत, नेत्र शल्य  चिकित्सक डॉ. स्वप्नाली बंडगर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी नेत्रदान पंधरवड्याचा मुख्य उद्देश हा बुब्बुळाची मागणी व पुरवठा यामधील तफावत भरून काढणे असून जिल्ह्यात नेत्रदान चळवळ वाढीस लागण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये सन 2008 ते 2022 या कालावधीमध्ये 4 हजार 481 नेत्रबुब्बुळे गोळा करण्यात आली व त्यापैकी 2 हजार 243 नेत्रबुब्बुळे प्रत्यारोपण करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेत्रदान समुपदेशक अविनाश  शिंदे यांनी केले. आभार नेत्रविभाग प्रमुख डॉ. सतीश देसाई यांनी मानले. या कार्यक्रमास नेत्रविभाग सहयोगी प्राध्यापक  डॉ. अर्चना कसबे, नोडल अधिकारी जगन्नाथ बाबर, नेत्र चिकित्सा अधिकारी रमेश कोथळे, अभिनंदन पाटील  तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.