आंतर भारती राष्ट्रीय निबंध स्पर्धेचे आवाहन
पुणे : पूज्य साने गुरुजी यांनी स्थापन केलेल्या आंतर भारती संस्थेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही. भाषेचे कोणतेही बंधन नाही. स्पर्धेचा विषय - महात्मा गांधीजींची प्रासंगिकता- वर्तमान समस्या सोडवण्यासाठी मार्ग व उपयुक्तता हा असून स्पर्धक आपले निबंध 700 ते 2500 शब्दांमध्ये स्वहस्ताक्षरात लिहून ऑनलाईन, व्हॉट्सॲप, कुरिअर ने किंवा पोस्टाने मयुर बाळकृष्ण बागुल, द लिबर्टी इन्स्टिट्यूट, भैरवनाथ तालीम संघाच्या वर, केसनंद, पुणे- 412207 या पत्त्यावर किंवा 8788923038 या व्हॉट्सॲप नंबर वर 15 सप्टेंरपर्यंत पाठवू शकता. राष्ट्रीय स्तरावर प्रथम 10 हजार, द्वितीय 7 हजार व तृतीय 3 हजार अशी रोख पारितोषिके असल्याची माहिती संयोजक मयुर बागुल यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.