Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले

 अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले


अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडली. अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले. अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडली  आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडली आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांची डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली. छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार असल्याने त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. सकाळी ११ वाजता ते अचानक चक्कर येऊन खाली पडले. यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. नंतर जे जे रुग्णालयात नेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. दोन दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.