Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बीएलओ सविता माने यांचा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केला सन्मान

बीएलओ सविता माने यांचा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केला सन्मान 


मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड जोडणी मोहिमेत धोंडगेवाडी गावाचे शंभर टक्के काम

सांगली दि. ३०  :  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या सांगली जिल्ह्यामध्ये मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड नोंदणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेमध्ये 286 खानापूर विधानसभा मतदार संघातील खानापूर तालुक्यातील यादी भाग क्रमांक 139 - धोंडगेवाडी येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तथा आशा सेविका सविता माने यांनी त्यांच्याकडे असलेल्या एकूण 353 मतदारांपैकी 315 मतदारांचे आधार कार्ड ओळखपत्राशी जोडणी केले आहे. 38 मतदार हे मयत आढळले आहेत. मयत व्यक्तींचे मतदार यादीतून नाव वगळणी करण्याकामी त्यांचे नमुना नंबर 7 बाबतचे अर्ज गोळा केले आहेत. त्यामुळे त्यांच्या केंद्राचे शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यांच्या या कामाबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याहस्ते आशा सेविका सविता माने यांचा अभिनंदन पत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. 

जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मारुती बोरकर, मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी विटा संतोष भोर, तहसीलदार विटा ऋषिकेत शेळके, ऑपरेटर संतोष मोहिते उपस्थित होते.

आशा सेविका सविता माने यांच्या या कामामुळे जिल्ह्यातील इतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना देखील त्यांचे काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपले मतदान ओळखपत्र  आपल्या आधार कार्डशी जोडून घेण्यासाठी आपल्या बीएलओ यांच्याकडे नमुना नंबर 6ब चा अर्ज भरून द्यावा किंवा आपण स्वतः देखील वोटर हेल्पलाइन वरून आपले आधार कार्ड लिंक करू शकता, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.

मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड नोंदणी मोहीमेमध्ये मतदान केंद्रनिहाय नेमणूक केलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तथा बी. एल. ओ. यांच्यामार्फत मतदारांचे नमुना नंबर सहा ब चे अर्ज गोळा करून घेतले जातात व ते अर्ज बीएलओ मार्फत गरुडा ॲप मधून भरून संबंधित मतदाराचे ओळखपत्र हे आधार कार्डला जोडले जाते. तसेच स्वतः मतदार देखील वोटर हेल्पलाइन या अँप वरून आपले मतदान ओळखपत्र आधार कार्डला जोडणी करू शकतात.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.