Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडून साथ रोग नियंत्रनाचा आढावा

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडून साथ रोग नियंत्रनाचा आढावा


महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडून साथ रोग नियंत्रनाचा आढावा  : 1200 कर्मचाऱ्यांकडून शनिवारी घर टू घर सर्व्हे : आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळण्याचे आयुक्त कापडणीस यांचे आवाहन


सांगली: महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी घेतला साथ रोग नियंत्रणाबाबत शुक्रवारी आढावा बैठक घेतली. यामध्ये 1200 स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून शनिवारी घर टू घर सर्व्हे करण्याचे आदेश देत आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहनही आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले.

सांगली मिरज आणि कुपवाड मनपाक्षेत्रात साठरोगांचा प्रसार होत असल्याने यावर नियंत्रण आणण्यासाठी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक आणि मुकादम यांची तातडीची बैठक घेतली. बैठकीस वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ सुनील आंबोळे, आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे उपस्थित होते

यावेळी कोणत्या भागात केसेस वाढल्या आहेत याची माहिती घेत डास आळी सापडलेल्या ठिकाणी काय उपाय योजना केल्या याची  माहिती घेतली. यावेळी डेंग्यू चिकणगुन्या, टायफोड, डायरिया स्वाईन फ्ल्यू,  मंकीपॉक्सबाबतचा आढावाही यावेळी घेण्यात आला.  तसेच संबंधित स्वच्छता निरीक्षक यांना प्रत्येक भागाचा सर्व्हे करण्याचे आदेशही आयुक्त कापडणीस यांनी दिले. तसेच रस्त्यावर पडलेले टायर जप्तीचे आदेशही देण्यात आले. तसेच बांधकाम ठिकाणे पाहणी करून त्याबाबतचा अहवाल देणे. खुली पाण्याची ठिकाणी याचा सर्व्हे करून सिलिकॉन ऑइल टाकनेबाबत सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच अति जोखमीच्या भागाची यादी तयार करून प्रतिबंधात्मक उपाय योजनाबाबत पाठपुरावा करण्याचे आदेश दिले. 

याचबरोबर शनिवारी मनपाचे 1200 कर्मचारी हे घर टू घर सर्व्हे करनार असून यामध्ये कुटुंबाची संपूर्ण माहिती , पाण्याच्या ठिकाणची माहिती आणि डास उपत्ती ठिकाणे याची माहिती हे कर्मचारी घेणार आहेत. याचबरोबर गटार स्वच्छता ,औषध फवारणी, टेरेस तपासणी, टॉयलेट विंडपाईप जाळी, पाण्याच्या टाक्यावर झाकण आल्याबाबतची नोंदही कर्मचारी घेणार आहेत. नागरिकांनी साथ रोग निर्मूलनासाठी आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहनही आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.