Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन - कार्यकारी अभियंता ज्योती देवकर

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन  - कार्यकारी अभियंता ज्योती देवकर


- धरणांतील विसर्ग व मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ 


सांगली दि. 12 : कोयना - वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिपर्जन्यवृष्टी होत असल्याने  दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून कोयना धरणाचे वक्रदरवाजे 1 फुट 6 इंच उघडून 8 हजार क्युसेक्स विसर्ग व धरण पायथा विद्युत गृहामधून 2 हजार 100 क्युसेक्स विसर्ग असा एकूण 10 हजार 100 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आलेला आहे. धरणांमधील विसर्गामुळे व मुक्त पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळे कृष्णा नदीची आर्यविन पूल येथील पाणी पातळी अंदाजे 35 फूटापर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी सतर्क रहावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.

आज सकाळी 11 वाजता कृष्णा नदीची आर्यविन पूल येथे पाणी पातळी 29 फूट 3 इंच इतकी आहे.  विविध धरणांमधील पाणीसाठा टी.एम.सी. मध्ये व कंसात पाणीसाठ्याची टक्केवारी तसेच विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 88.11 (83), विसर्ग 10 हजार 100, धोम 11.74 (87), कन्हेर 8.85 (88), विसर्ग 8 हजार 642, उरमोडी 8.95 (90),विसर्ग 5 हजार 54, तारळी 5.29 (90), विसर्ग 1 हजार 212, वारणा 31.54 (92), विसर्ग 9 हजार 371.  अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील 0233-2301820, 2302925 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.