Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गणेशोत्सवातील धार्मिक ऐक्याची शतकपूर्ती! ; आगमन मिरवणुकीचा मान मुस्लीम बांधवांनाच

गणेशोत्सवातील धार्मिक ऐक्याची शतकपूर्ती! ; आगमन मिरवणुकीचा मान मुस्लीम बांधवांनाच


श्री गणेश सेवा मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात आजही हिंदू, मुस्लीम आणि अन्य धर्मीयांतील ऐक्याचे दर्शन ......! गणेशोत्सवातील धार्मिक ऐक्याची शतकपूर्ती! ; आगमन मिरवणुकीचा मान मुस्लीम बांधवांनाच गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेनुसार मंडळाच्या आगमन मिरवणुकीत गणेशमूर्तीचा रथ ओढण्याचा मान यंदाही मुस्लीम बांधवांना देण्यात आला होता. 

मुंबई : यंदा शतक महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या वरळी नाक्यावरील आचार्य अत्रे चौकाजवळील श्री गणेश सेवा मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात आजही हिंदू, मुस्लीम आणि अन्य धर्मीयांतील ऐक्याचे दर्शन घडत आहे. गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेनुसार मंडळाच्या आगमन मिरवणुकीत गणेशमूर्तीचा रथ ओढण्याचा मान यंदाही मुस्लीम बांधवांना देण्यात आला होता. 

साधारण १०० वर्षांपूर्वी वरळी परिसरात दाट लोकवस्ती होती. व्यापारी केंद्र अशीही या परिसराची ओळख होती. या परिसरात सामाजिक आणि धार्मिक सलोखा राखला जावा या उद्देशाने सर्वधर्मीय बांधवांनी एकत्र येऊन विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून परिसरातील सर्वधर्मीय आणि व्यापारी मंडळींनी १९२२ मध्ये श्री गणेश सेवा मंडळाची स्थापना केली. सामाजिक आणि धार्मिक एकात्मता लक्षात घेऊन तेव्हापासून मंडळाच्या आगमन मिरवणुकीत गणेशमूर्तीची पालखी उचलण्याचा मान मुस्लीम बांधवांना देण्यात आला होता. कालौघात गणेशमूर्तीची उंची वाढविण्यात आली आणि त्यानंतर रथावरून गणेशाचे आगमन होऊ लागले आणि रथ खेचण्याचा मान मुस्लीम बांधवांकडेच कायम राहिला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.