Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अत्यंत भयानक. काळीज हेलावून टाकणारी ही लिंक पहाच.

अत्यंत भयानक. काळीज हेलावून टाकणारी ही लिंक पहाच.


कपिल सिब्बल यांनी काल काँग्रेस मुख्यालयात प्रेस काँफेरन्स घेतली. एकही चॅनेलने दाखविली नाही. एनडिटीव्ही ने दाखवायला सुरुवात केली पण लगेच बंद केली, असे कळले आहे. याचे कारण तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखू शकता. नोटबंदी होण्याच्या फार अगोदर, आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या सहीने, रुपये 2000 च्या नोटा प्रचंड प्रमाणात परदेशात छापल्या. त्या  विमानाने, एअर फोर्स च्या विमानतळावर आणल्या गेल्या. त्या रिजर्व बँकेच्या माध्यमातून, जुन्या नोटांच्या बदल्यात, घाऊकपणे प्रायव्हेट डील करून, प्रायव्हेट पार्टीज ना बदलून देण्यात आल्या. त्यातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला. 

https://www.youtube.com/watch?v=3JiJq0MEa4g

या कामाकरिता RAW ची व आरबीआय ची माणसे गुप्तपणे कामाला लावली होती. एकूण तीन लाख कोटी रुपये बदलून देण्यात आले. RAW चा अधिकारी रवी रात्रेकर याचे मदतीने 20000 कोटी बदलण्यात आले. हे रिजर्व बँक बेलापूर शाखा यांच्या मदतीने बदलण्यात आले. संजय शाने मॅनेजर इंडसइंड बँक फोर्ट शाखा मुंबई याचे मदतीने, त्या बँकेच्या शाखेत 320 कोटी बदलण्यात आले. रबाळेनवी मुंबई येथील एमआयडीसी च्या गोडावून मध्ये 25000 कोटी रुपये बदलून देण्यात आले. अशी माहिती कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत दिली असून, याबाबतच्या स्टिंग  ऑपरेशनचे विडिओ व संभाषणाच्या ट्रान्स्क्रिप्ट सुद्धा पत्रकार परिषदेत दाखविले आहेत.या पत्रकार परिषदेत दाखविण्यात आलेल्या व्हिडिओत अमित शहा, जय शहा, बँकांचे अधिकारी, RAW चे अधिकारी, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची नावे आहेत. ही पत्रकार परिषद वर दिलेल्या यु ट्यूब लिंकवर उपलब्ध आहे. ती पहावी आणि देश कोणाच्या हातात आहे ते पाहावे.

अर्थात ही क्लिप बनावट आहे असा दावा केंद्र सरकार करेल. पण सुप्रीम कोर्टात आयुष्यभर वकिली करणारे घटनातज्ञ वकील कपिल सिब्बल यांनी ही पत्रकार परिषद घेतली आहे.स्वतः शहानिशा केल्याशिवाय ते बोलले नसल्याची शक्यता आहे. केंद्र सरकार जर स्वच्छ असेल तर केंद्राने  निवडणुकीचे मतदान सुरू होण्यापूर्वी याची चौकशी करावी. कपिल सिब्बल यांनी केलेले आरोप खोटे ठरले तर त्यांच्यावर देखील  कारवाई  करा ना.तसे करण्यास  केंद्र सरकारला कोणी रोखलेले नाही.

ही पत्रकार परिषद टीव्हीवर दिसत नाही याचा अर्थ प्रत्येकाने समजून घ्यावा.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.