Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नेवाशात पोलीस निरीक्षकासह पत्रकारावर खंडणीचा गुन्हा

नेवाशात पोलीस निरीक्षकासह पत्रकारावर खंडणीचा गुन्हा


बेपत्ता मुलीच्या आजोबांनी तक्रार केल्यामुळे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार आणि पत्रकार सुनील गर्जे यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी तालुक्यातील जानकू कोकरे यांनी या संदर्भात 11 मे रोजी फिर्याद दिलेली होती. त्यानंतर तीन महिन्यांनी हा गुन्हा दाखल करण्यात आला.

कोकरे यांच्या नातेवाईकांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी पत्रकार सुनील गर्जे याच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक पोवार यांनी कोकरे यांच्याकडून दीड लाख रुपयांची खंडणी घेतली. त्यानंतर ही दीड लाख रुपयांची रक्कम पत्रकार गर्जे यांनी पुन्हा फिर्यादी कोकरे यांना परत दिली. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.