Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा शहर जिल्हा काँग्रेसतर्फे सत्कार

मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा शहर जिल्हा काँग्रेसतर्फे सत्कार


सांगली, दि. १३ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज सांगली दौऱ्याचे वेळी भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजला भेट दिली. यावेळी सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.

यावेळी माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम, आ. पी. एन. पाटील, आ. विक्रम सावंत, माजी आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी डॉ. मतांडा राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, महेंद्र लाड, हणमंतराव कदम, जितेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या वेळी सांगली शहरातील प्रश्नाबाबत मा. मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केली.

यावेळी विरोधी पक्षनेते संजय मेढे, नगरसेवक मंगेश चव्हाण, अभिजित भोसले, प्रकाश मुळके, मयूर पाटील, तौफिक शिकलगार, सनी धोत्रे, अयुब निशाणदार, संतोष भोसले, आशिष चौधरी, विशाल कलगुटगी, रहीम हट्टीवाले हेही उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.