Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरी 


: आटपाडी तालुक्यात घडली होती बलात्काराची घटना.



स्वतः विवाहित असूनही शेतामध्ये शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून गरोदर करणाऱ्या नराधम तरुणास न्यायालयाने दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. विष्णू मारुती माडेकर (वय २३ रा. घुळखेड, जि. विजापूर सध्या चिंचाळे, ता. आटपाडी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सदरची घटना हि जून २०१८ मध्ये आटपाडी तालुक्यातील चिंचोळे येथे घडली होती. सदरची शिक्षा हि विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी विष्णू मारुती माडेकर हा मूळचा कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातल्या घुळखेड गावचा रहिवाशी आहे. आटपाडी तालुकूणातील चिंचाळे येथील राजाराम जगदाळे यांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून तो काम करत होता. आरोपी माडेकर याचा विवाह यापूर्वी झाला होता. पीडित मुलगी ही जगदाळे यांच्या शेतामध्ये शेळ्या चारण्यासाठी जात होती. त्यावेळी आरोपी हा शेतामध्ये ऊसाला पाणी पाजण्याचे काम करत होता. पीडिता ही शेळयांना चारण्यासाठी सोडून झाडाखाली थांबली होती, त्यावेळी आरोपीने तिला हाक मारून बोलावले व तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी पीडित मुलगी ही १३ वर्षांची होती. त्यामुळे भीतीपोटी तिने ही घटना कुणालाही सांगीतली नाही. 

दि. ०६. जून २०१८ रोजी पीडित मुलीला उलट्या व मळमळ होत असल्याने तिला खरसुंडी आणि आटपाटीच्या दवाखान्यामध्ये तपासणीसाठी पाठवले. त्यावेळी तिथल्या डॉक्टरांनी तिची तपासणी करुन ती दोन महिन्याची गरोदर असल्याचे सांगितले. त्यानंतर पीडितेला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी सांगलीतील सिव्हील हॉस्पीटल येथे आणण्यात आले. त्यावेळी दवाखान्यामध्ये पीडित मुलीच्या आईने आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये मुलीचाही जबाब नोंदवण्यात आला. सदर मुलीचा सांगली सिव्हील हॉस्पीटलमध्ये कायदेशीररित्या गर्भपात करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीला अटक करण्यात आली व डीएनए सँपल गोळा करुन ते वैद्यकीय तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले. 

त्यानंतर इतर साक्षीदाराचे जाबजबाब नोंदवण्यात आले. आरोपी माडेकर याच्या विरोधात सबळ पुरावा मिळाल्यानंतर आटपाडी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यासाठी सरकारी पक्षातर्फे एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेचा जबाब, आईचा जबाब, वैद्यकीय पुरावा, त्याचबरोबर न्यायवैज्ञानिक यांचा अहवाल, ज्या अहवालामध्ये पीडित मुलगी व आरोपी हेच मुलाचे आई-वडिल असल्याचे नमूद केले होते यांचा विचार करुन सदर आरोपीला दोषी धरण्यात आले. या खटल्यासाठी सरकापक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सौ. आरती आनंद देशपांडे (साटविलकर) यांनी काम पाहिले. याकामी पैरवी कक्षाच्या पोलीसांचे सहकार्य लाभले. हवालदार श्रीमती रमा डांगे, श्रीमती वंदना मिसाळ, शरद राडे, गणेश वाघ, श्रीमती. दीपा सूर्यवंशी, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.