ना बावनकुळे, ना शेलार, ना दरेकर, मंत्रिमंडळात भाजपचं सरप्राईज पॅकेज, कोण आहेत सुरेश खाडे?
मुंबई, 8 ऑगस्ट : महाराष्ट्रामध्ये शिंदे-फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर 38 दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवनात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
भाजपकडून आतापर्यंत 9 जणांची नावं समोर आली आहेत. यामध्ये चंद्रकांतदादा पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावीत यांना आतापर्यंत फोन गेला आहे. यातले सांगलीचे आमदार सुरेश खाडे यांचं नाव सरप्राईज म्हणून समोर आलं आहे.
कोण आहेत सुरज खाडे?
जन्मदिनांक :- १ जून १९५८ शिक्षण
1) वेल्डिंग डिप्लोमा ( व्हिजीटीआय , मुंबई ) ब्रॉन्झ व सिल्वर मेडल
2) डॉक्टरेट , कोलंबो युनिव्हरसिटी , श्रीलंका व्यवसाय :-
उद्योग व शेती आमदार सुरेश खाडे हे 2004 साली जत मधून, 2009 साली मिरज मधून तर 2014 आणि 2019 साली पुन्हा मिरज मधून असे सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
सुरेश खाडे हे भाजपचे सांगली जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून आलेले पहिले आमदार आहेत. त्यापूर्वी त्यांनी १९९९ ला जत राखीव मतदार संघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. भाजपमध्ये आल्यानंतर सुरेश खाडे हे भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या गटाचे म्हणून ओळखले जातात.
भाजपचा जिल्ह्यातील दलित चेहरा अशी त्यांची ओळख आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर त्यांनी विधानसभेत अनेक वेळा आवाज उठवला आहे. उद्योजक असणाऱ्या सुरेश खाडे यांनी आपल्या राजकीय जीवनाची वाटचाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षातून केली. त्यांनी १९९९ ला जत या अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या मतदार संघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून निवडणूक लढवली.
मात्र या निवडणुकीत खाडे पराभूत झाले. कॉंग्रेसचे उमाजी संनमडीकर हे त्यावेळी विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. सुरेश खाडे 2004 साली जत राखीव मतदार संघातून 26,000 मताधिक्यानी विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेसचे उमाजी संनमडीकर यांचा पराभव केला आणि खाडे यांनी जिल्ह्यात पहिले कमळ फुलविले. या विजयात जेष्ठ नेते विलासराव जगताप यांचा मोठा हातभार होता. कोणती पदं भुषवली? सदस्य अनुसूचित कल्याण समिती , महाराष्ट्र विधानसभा सदस्य अंदाज समिती , महाराष्ट्र विधानसभा सदस्य पंचायत राज समिती , महाराष्ट्र विधानसभा सदस्य उपविधान समिती , महाराष्ट्र विधानसभा संचालक , राहुरी कृषी विद्यापीठ , राहुरी सांगली जिल्हा भाजप , अध्यक्ष ( ग्रामीण
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.