Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डॉ.नरेंद्र दाभोलकर

डॉ.नरेंद्र दाभोलकर 


यांचा आज ९ वा स्मृतीदिन. २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी ते मॉर्निंग वॉक ला जात असताना त्यांची पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पूलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तो दिवस आठवतो. मी सकाळ पासून ते सायंकाळी त्यांचे पार्थिव साताऱ्याला रवाना होई पर्यंत तेथे होतो.

काय गुन्हा होता त्यांचा ? 

तर जनतेला शहाणं करणे, त्यांना अंधश्रध्दांच्या जोखडातून बाहेर काढणे. यासाठी त्यांना आपला जीव गमवावा लागला. 

पण जनता शहाणी झाली का ? तर नाही.

इथली व्यवस्था जनतेला शहाणी होऊ देत नाही. त्यामुळं जनतेनेही ठरवलंय आपण शहाणं व्हायचं नाही. 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' या उक्ती प्रमाणे राहायचं. 

पण दाभोलकरांच्या बलिदाना नंतर सरकारने जादूटोणा विरोधी कायदा केला. यामुळं समाजातील अंधश्रद्धांचं निर्मूलन झालं का ? तर नाही. उलट फोफावत चाललीय. कारण राज्यकर्त्यांची इच्छाशक्तीच नाही. समाजहिताचा बळी दिला तरी चालेल,पण आमच्या मतपेटीला धक्का लागता कामा नये,हे त्यांचे धोरण. काही मोजके विचारवंत ,साहित्यिक सोडले तर बाकीचे बोटचेपी भूमिका घेतात.

वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारा, अंगिकारा,हे भारतीय राज्यघटनेत सांगितलंय. त्यासाठी समाजानेच उचल खाल्ली पाहिजे, हीच डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना आदरांजली ठरेल......!

        Adv.Kiran Kadam.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.