Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त

देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त


सांगली दिं.१७ : देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील अण्णा लोकसेवा फाँऊडेशनच्या वतीने येथील महापालिका शाळा नं२२ मध्ये विद्यार्थ्यांना गणवेश आणि दप्तर वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध उपक्रम राबविणारे अण्णा लोकसेवा फाँऊडेशनने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे केला.शाळा नंबर २२ मधील विद्यार्थ्यांना दप्तर आणि गणवेश या प्रभागाचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. 

यावेळी बोलताना नगरसेवक ठोकळे म्हणाले, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अण्णा लोकसेवा फाँऊडेशनने अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविला आहे.शिक्षण घेताना गोरगरीबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.मात्र अशा उपक्रमांतून अडचणींवर मात करता येते.त्यामुळे अशा उपक्रमांची गरज आहे. यावेळी माजी नगरसेविका शेवंता वाघमारे,अमर निंबाळकर, उत्तम कांबळे, अर्जुन मजले, विनायक हेगडे,अक्षय मासाळे उपस्थित होते.प्रारंभी अण्णा लोकसेवा फाँऊडेशनचे संस्थापक अशोक मासाळे यांनी या उपक्रमामागची भुमिका स्पष्ट केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.