शिक्षण संस्था महामंडळ अधिवेशनाचे मंत्री ना. खाडे यांना निमंत्रण.. अधिवेशनाला संपूर्ण सहकार्य करणार - ना. सुरेशभाऊ खाडे
सांगली दि.३०: दि. २ ऑक्टोबर २०२२ रोजी सांगलीत धनंजय गार्डन मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या राज्यस्तरीय महाधिवेशनास उपस्थित राहणार व शिक्षण संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द असल्याचे कामगार मंत्री ना. सुरेशभाऊ खाडे यांनी महामंडळाच्या शिष्टमंडळाला दिले.बहुजन समाजाचे शिक्षण करणाऱ्या खासगी शिक्षण संस्थांच्या महामंडळाचे अधिवेशन सांगलीत होत आहे ही बाब जिल्ह्य़ाला भूषणावह आहे व खासगी शिक्षण संस्थांचे प्रश्न शासनाला सादर करुन त्यांचा निपटारा करण्यासाठी अधिवेशन हे चांगले माध्यम आहे असेही ते म्हणाले.
दि. २ ऑक्टोबर रोजी सांगलीत महामंडळाचे भव्य महाधिवेशन होणार आहे. त्याचे निमंत्रण स्वागताध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील, कोल्हापूर विभागाचे सेक्रेटरी प्रा. एन.डी.बिरनाळे, विभागीय संघटक विनोद पाटोळे, काकासाहेब धामणे मालगाव, सागर वडगावे आरग व विपुल पाटील यांनी ना. खाडे यांना दिले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मोहन वनखंडे उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.