Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलिस निरीक्षक सतीश शिंदे एलसीबीचे प्रभारी अधिकारी अभिजित देशमूख सांगली शहरचे प्रभारी

पोलिस निरीक्षक सतीश शिंदे एलसीबीचे प्रभारी अधिकारी अभिजित देशमूख सांगली शहरचे प्रभारी


सांगली : सांगली गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांची प्रभारी अधिकारी म्हणून मंगळवारी नियुक्ती करण्यात आली आहे. तर सांगली शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय सांगली वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी म्हणून मुकुंद कुलकणीर् यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. दरम्यान एलसीबीचे प्रभारी निरीक्षक अजय सिंदकर यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. सिंदकर यांच्या बदलीचे आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षकांनी दिले आहेत. 

सांगली एलसीबीचे निरीक्षक म्हणून सिंदकर यांनी दि. ३१ मे रोजी कायर्भार घेतला होता. त्यानंतर पोलिस अधीक्षकांचे वाचक असलेले शिंदे यांची सांगली शहरचे पोलिस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली होती. केवळ दोन महिन्यातच या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने आश्चयर् व्यक्त केले जात आहे. यापूवीर् पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनीही जिल्ह्यात सहाय्यक निरीक्षक पदावर काम केले होते. गेल्या महिन्यातच त्यांची जिल्हा वाहतूक शाखेच्या प्रभआरीपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांची शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्.यात आली आहे.वाहतूक शाखेच्या प्रभारीपदी नियुक्ती झालेले मुकुंद कुलकणीर् यांनी यापूवीर् ,सीआय़ीडचे प्रभारी म्हणून काम केले होते. दरम्यान राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या अजून झालेल्या नसतानही या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने आश्चयर् व्यक्त केले जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.