Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्वातंत्र्यदिनी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर शालेय विद्यार्थ्यांनी साकारली तिरंगा प्रतिकृती

स्वातंत्र्यदिनी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर शालेय विद्यार्थ्यांनी साकारली तिरंगा प्रतिकृती


स्वातंत्र्यदिनी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर शालेय विद्यार्थ्यांनी साकारली तिरंगा प्रतिकृती : मनपाक्षेत्रातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी साकारली तिरंगा प्रतिकृती महापालिका : नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी हजारो सांगलीकरांची उपस्थिती


सांगली : भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित आणि 75 व्या स्वातंत्र्यदिनी सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर शालेय 1008 विद्यार्थ्यांनी तिरंगा प्रतिकृती साकारली.  मनपाक्षेत्रातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी ही तिरंगा प्रतिकृती साकारली. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून आयोजित हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी हजारो सांगलीकरांनी उपस्थिती लावली होती. आमदार सुधीरदादा गाडगीळ, महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा नेत्रदीपक सोहळा संपन्न झाला.

    सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित आणि माझी वसुंधरा , स्वच्छ सर्व्हेक्षण, रेस टू झिरो, सेव्ह सोईल या अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये तिरंगा मॅरेथॉन, स्केटींग स्पर्धा, स्वातंत्र्यसेनानी , माजी सैनिक सत्कार , विधवांना तिरंगा ध्वज वाटप, कब्बडी स्पर्धा , आरोग्य सैनिकांचा सत्कार यासह अनेक उपक्रम पार पडले.  15 ऑगस्ट 2022 रोजीच्या स्वातंत्र्य दिनी महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांच्या संकल्पनेतून एक आगळा वेगळा उपक्रम पार पडला. यामध्ये महापालिका क्षेत्रातील तक्षशिला स्कुल, आप्पासाहेब बिरनाळे स्कुल, रजपूत इंग्लिश स्कुल तसेच पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या 1008 विद्यार्थी आणि विद्यर्थिनींचा समावेश करून भारतीय तिरंगा ध्वजाची प्रतिकृती साकारण्यात आली. नेत्रदीपक आणि सर्वाना प्रेरणादायी ठरणाऱ्या या उपक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम खचाखच भरले होते. 

प्रारंभी श्रीराम दयाळ मालू हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर करण्यात आले तसेच ध्वज गीताने कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. यानंतर मालू हायस्कुलच्या 59 विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले तर रजपूत इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करीत देशभक्ती जागृत केली. यानंतर विद्यार्थ्यांनी साकारलेली तिरंगा प्रतिकृती साकारण्यात आली. यावेळी हजारो सांगलीकर जनतेने हा नेत्रदीपक सोहळा पहात महापालिका प्रशासनाने अभिनंदन केले. अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध 1008 विद्यार्थ्यांनी तिरंगा प्रतिकृती साकारल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. 

या सोहळ्यासाठी सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ,  महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आयुक्त सुनील पवार,  अप्पर पोलीस अधीक्षक सौ मनीषा दुबुले, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, महापालिकेचे स्थायी सभापती निरंजन आवटी, सभागृह नेते विनायक सिंहासने, विरोधीपक्ष नेते संजय मेंढे, महिला बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे पाटील, माजी उपमहापौर आणि नगरसेवक शेखर इनामदार, धीरज सुर्यवंशी, गजानन मगदूम, प्रकाश ढंग, लक्ष्मण नवलाई, नगरसेविका सविता मदने, स्वाती शिंदे, उर्मिला बेलवलकर, अप्सरा वायदंडे, अनारकली कुरणे, सुनंदा राऊत, शुभांगी साळुंखे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे, संजीव ओहोळ , आरोग्यधिकारी डॉ सुनील आंबोळे, हळद व्यापारी मनोहर सारडा, पै गौतम पवार , किरण भोसले , अश्रफ वांकर , राहुल ढोपे पाटील, याची प्रमुख उपस्थिती होती. तसेच निवृत्त लष्करी आणि सेना कर्मचारी सैनिक सुद्धा या कार्यक्रमास हजर होते. या नेत्रदीपक सोहळ्याचे नियोजन मनपाउपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी गीता शेंडगे यांच्या टीमने केले. 

मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार , सहायक आयुक्त नितीन शिंदे , डॉ रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छ सर्व्हेक्षणच्या समन्वयक अधिकारी वर्षाराणी चव्हाण आणि टीम नियोजनात सहभागी झाली होती. यावेळी सांगली जिल्हा पोलिस दलाकडून लावण्यात आलेल्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच श्वान पथकाची तसेच सांगली शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून सुद्धा नियमांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयदादा कडणे आणि महापालिकेचे ब्रँड अंबेसिडर दीपक चव्हाण यांनी केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.