Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वारणा समूहात ऊर्जाकूरची भर

वारणा समूहात ऊर्जाकूरची भर


वारणानगर, ता. १८ : येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या मालकीचा झालेला ऊर्जाकूर सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर उद्या (ता. १९) कारखाना कार्यस्थळावर नवचंडी यज्ञ व शेतकरी सभासदांसाठी भोजन अशा कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहीती वारणा समूहाचे नेते आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.

डॉ. विनय कोरे अपारंपरिक ऊर्जा मंत्री असताना शासकीय व खासगी गुंतवणूकीतून वीजनिर्मितीसाठी 'ऊर्जाकूर निधी ट्रस्ट'ची स्थापना केली. राज्याला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण महत्त्वाकांक्षी धोरण आखले. याच धोरणांर्गत शासनाने सहकारी साखर कारखान्यांसाठी 'बांधा वापरा आणि हस्तांतरित करा' तत्त्वावर बगॅसपासून सहवीजनिर्मिती प्रकल्प उभारणीचे धोरण ठरविले. 

राज्यातील खासगी व सहकारी साखर कारखानदारी क्षेत्रातील बॅगसपासून सहवीजनिर्मिती करणारा ४४ मेगावॉट प्रकल्पाची उभारणी केली. हा ऊर्जाांकूर सहवीजनिर्मिती प्रकल्प हा देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, तो २०१०-११ मध्ये सुरू झाला. प्रकल्पातून बॅगसपासून ४४ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू झाली. ३५० कोटींची गुंतवणूक केली होती. हा प्रकल्प आज सुमारे ८०० कोटी रुपये भांडवली गुंतवणुकीचा झालेला असून ८० एकरांत हा प्रकल्प आहे. वीज वहनासाठी वाठार आणि वारणानगर सबस्टेशन १३२ केव्ही पारेषण वाहिनीचा समावेश आहे. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम त्यांनी वारणा समूहाच्या भेटीप्रसंगी गौरविलेल्या वारणा उद्योग समूहात उर्जाकूर सहवीज प्रकल्पाची भर पडली आहे.

'बांधा वापरा व हस्तांतरित करा' या तत्वावरील प्रकल्पात शासन व कारखान्याने गुंतवणूक केली होती. प्रकल्प हस्तांतरीत करून समूहाच्या मालकीचा करण्यासाठी कायदेशीर लढाईसह अनेक संकटासह संघर्ष करावा लागला.  हा प्रकल्प वारणाच्या मालकीचा झाल्याने उद्या कारखाना स्थळावर सकाळी ६.१५ वाजता नवचंडी यज्ञ आयोजित केला असून सकाळी ११ वाजता सभासदांसाठी भोजन व्यवस्था केली आहे. सोहळ्यास सभासद शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार डॉ. कोरे यांनी केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.