Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांना आमदार सुधीरदादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालयात अभिवादन..

आण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांना आमदार सुधीरदादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालयात अभिवादन..


सांगली सोमवार १ ऑगस्ट :- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी  आमदार गाडगीळ कार्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी ते म्हणाले, लोकमान्य टिळक लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे व अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे होते. इंग्रजांविरुद्ध जनतेने एकत्र यावे, लढा द्यावा यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केले. 

लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे देखील सुरू केली होती.    "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !" अशी सिंहगर्जना  संपूर्ण भारत देशामध्ये स्वराज्याची  भावना निर्माण करून त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण करण्याचे कार्य टिळकांनी केले, यामुळेच टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे देखील बोलले जाते तसेच " लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 आँगस्ट रोजी सांगली जिल्हयामधील वाळवा नावाच्या तालुक्यात असलेल्या वाटेगाव ह्या छोटयाशा गावी एका सामान्य कुटुंबात झाला. 

अण्णाभाऊ साठे हे एक समाजसुधारक तर होतेच याचसोबत ते एक साहित्यिक, लेखक, कांदंबरीकर, देखील होते. असे व्यक्तव्य यावेळी त्यांनी केले. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, संघटन सरचिटणीस दीपक माने, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक राजेंद्र कुंभार , लक्ष्मण नवलाई, प्रवक्ते मुन्नाभाई कुरणे, नगरसेविका सविता मदने, गीता पवार, प्रीती मोरे, माधुरी वसगडेकर, रेखा इंगळे, संगीता जाधव, प्रसाद व्हळकुंडे, अमित भोसले, प्रियानंद कांबळे,  गणपती साळुंखे, आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.