शिंदे यांच्याशी युती शक्य नाही - आमदार किशोर पाटील
राज्यात एकनाथ शिंदे गट व भाजपाची युती असून भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे हे आपल्या विरोधात व पालिकेच्या विरोधात कशा तक्रारी करतात या प्रश्नावर उत्तर देतांना आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की, राज्यात जरी आमची युती असली तरी पाचोऱ्यात अमोल शिंदे व माझे आयूषात कधीच सख्य होणार नाही. पाचोरा नगरपरीषद हद्दीत नगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी गटाने २०० कोटी रुपयाचे भुखंड लाटल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर आमदार किशोर पाटील यांनी शुक्रवारी त्यांचे निवासस्थानी तातडीची पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व अॅड. अभय पाटील यांनी केलेल्या आरोपाचे खंडण करत त्यांचे हे आरोप खोटे व बिनबुडाचे असून जनतेची दिशाभूल करणारे आहे.
अॅड. अभय पाटील हे किती ब्लॅक मेलर असून ते सर्व तालुका वासीयांना ज्ञात आहे, तर आमोल शिंदे यांचे वडील पंडीत शिंदे हे नगराध्यक्ष असतांना त्यांनी व सतीष शिंदे यांनी पालिकेचे किती भुखंड लाटले आहेत. यावर २७ भुखंडाविषयी शेखर पाटील यांनी शिंदे माध्यमिक विद्यालय परीसरातील नागरीकांनी दावे दाखल केले आहेत. हे सर्व जनतेला ज्ञात आहे. सुरवात त्यांनी केली असून त्यांनी हडपलेले भुखंड परत मिळवून देत या प्रकरणाचा शेवट मी करणार असल्याचे किशोर पाटील यांनी म्हटले आहे.
आमदार किशोर पाटील यांनी २०० कोटीच्या अमोल शिंदे यांनी लावलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परीषदेत जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, मुकुंद बिल्दिकर, तालुका प्रमुख सुनिल पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, ज्ञानेश्वर चौधरी, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, राम केसवाणी, वाल्मिक पाटील, सतिष चेडे, रहिमान तडवी, बापू हाटकर, प्रविण ब्राम्हणे, शिवदास पाटील, शेखर पाटील उपस्थित होते, यावेळी मुकुंद बिल्दिकर यांनी २०० कोटी रुपयाच्या भुखंड लाटल्याच्या आरोपाचे खंडण करत, ज्या तीन चार नागरीकांच्या जमिनी अनेक वर्षांपासून पडून होत्या त्यांनी नगरपरिषदेकडे अर्ज करुन त्यावरील आरक्षण उठविण्याची विनंती केली होती.
त्यानुसार नगरपालिका प्रशासनाने रितसर ठराव करुन नगरपालिका अधिनियम १९६६ चे कलम ३७, ७२०, ४९, ५० च्या तरदुती नुसार पारीत झालेला ठराव नगररचना विभाग जळगांव, नाशिक व पुणे येथे सादर केला आहे. या उलट अमोल शिंदे यांचे वडील पंडीत शिंदे हे नगराध्यक्ष असतांना त्यांनी विवेकानंद नगर भागातील भुखंड असलेल्या जागेवर आरक्षण उठवून त्या ठिकाणी त्यांची शिंदे माध्यमिक विद्यालयाची इमारत उभी केली आहे. यावर परीसरात नागरीक अनेक वर्षांपासून न्याय मागत आहे. या शिवाय शहरातील सेंट्रल हॉलमध्ये व नवजीवन सुपर शॉपीच्या बांधकाम करतांना कोणत्याही प्रकारची सुविधा न देत नकाशात दाखवलेल्या जागेपेक्षा जास्त बांधकाम केले आहे व नुरानी नगर येथील ओपन स्पेस हडपला असल्याचे म्हटले आहे.
अमोल शिंदे यांचे काका सतीष शिंदे यांनी भास्कर नगर जवळील सुशील डेअरीचे बांधकाम करतांना येथील ओपन स्पेसची ५० टक्के जागा हडप करुन त्यावर बांधकाम केले आहे, याशिवाय त्यांच्याच काळात रमेश वाणी, सुरेश मोर, रमेश मोर व अतुल संघवी यांनी पालीकेच्या जागेवर डल्ला मारला असून ते खरे चोर असतांना २०० कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा खोटा आरोप करीत असल्याने त्यांचे बुद्धीची कीव करावीशी वाटते असेही बिल्लीकर यांनी अतिशय तिव्र शब्दात प्रतिक्रिया दिल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.