क्रांतीकारकांचे स्मारक जतन करायला हवे - पृथ्वीराज पाटील
सांगली, दि. ९ : ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त हुतात्मा स्मारक, सांगली येथे झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, डॉ. विजयकुमार शहा व रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रेमराज जाजू हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ बॅ. ए. आर. अंतुले यांनी हुतात्मा स्मारक उभे केले. क्रांतीकारकांचा जिल्हा म्हणून सांगलीची ओळख आहे. क्रांतीसिंह नाना पाटील, वसंतदादा पाटील सारख्या अनेक क्रांतिकारकांनी जिल्हयामध्ये स्वातंत्र्य लढा तेवत ठेवला. त्याचे स्मारक जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव यंदा साजरा होत आहे. स्वातंत्र्यासाठी कॉंग्रेस पक्षाने जे योगदान दिले, ते अत्यंत मोठे आहे. सांगली जिल्हा कॉंग्रेस व शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने आजादी गौरव पदयात्रा संपुर्ण जिल्हाभर काढण्यात येत आहे, त्याची सुरूवात आज देवराष्ट्रे येथून झाली आहे.
यावेळी स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे उत्तराधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने, अशोक जयराम कुष्टे, अशोक मालवणकर, प्रकाश शेटे, अशोक रामचंद्र वारे, प्रमोद नाथाजी लाड, रघुनाथ बाळकृष्ण नार्वेकर, बाबगोंडा पाटील, जयसिंगराव लक्ष्मणराव सावंत, सुरेश बुटाले, कवठेपिरान, रामचंद्र गणपती पवार यांचा समावेश होता.
प्रास्ताविक सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी केले. आभार रोटरी क्लबचे सांगली सिटी अध्यक्ष प्रेमराज जाजू यांनी मानले. यावेळी रोटरी क्लबचे रणजीत माळी, सेवादलचे श्रीधर बारटक्के, अरूण पळसुले, भाऊसाहेब पवार, विठ्ठलराव काळे, सौ. सीमा कुलकर्णी, जुबेदा बिडाली, अनिल माने, प्रकाश माने, तानाजी जाधव, शहाजीबापू जाधव, नामदेव पठाडे, विश्वास यादव, सुरेश गायकवाड, शिवाजी पाटील आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर महात्मा गांधी, पंडित नेहरू, आण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आण्णासाहेब पत्रावळे, कर्मवीर भाऊराव पाटील, वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील आदी पुतळ्यांना अभिवादन केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.