Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पत्राचाळ घोटाळा प्रकरण: संजय राऊतांविरोधात ईडीच्या हाती आणखी महत्त्वाचे पुरावे?

 पत्राचाळ घोटाळा प्रकरण: संजय राऊतांविरोधात ईडीच्या हाती आणखी महत्त्वाचे पुरावे?


पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीने बुधवारी केलेल्या छापेमारीत आणखी काही महत्त्वाचे कागदपत्रे हाती लागले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ईडीने बुधवारी मुलुंड, भांडूप, आणि विक्रोळी परिसरात छापेमारी केली होती.

ईडीने बुधवारी मुलुंड येथील श्रद्धा डेव्हलपर्सच्या कार्यालयावर छापा मारला होता. याा छापेमारी दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांसह संगणकाचीही तपासणी केली होती. श्रद्धा डेव्हलपर्सचे विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड परिसरात इमारत बांधकामाचे प्रकल्प सुरू आहेत. त्यापैकी बहुतांशी कामे हे संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांच्या मतदारसंघातील आहे. काही प्रकल्प पूर्ण झाले असून काहींचे बांधकाम सुरू आहे.

श्रद्धा डेव्हलपर्स ईडीच्या रडारवर का?

संजय राऊत यांच्याकडे असलेल्या महागड्या कारची खरेदी श्रद्धा डेव्हलपर्सकडून करण्यात आली असल्याचे तपासाता समोर आले. त्यानंतर ईडीने छापा मारला. श्रद्धा डेव्हलपर्सने खरेदी केलेल्या कार आणि आर्थिक व्यवहाराची चौकशी ईडीकडून सुरू करण्यात आली आहे.

पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्यातील रक्कमेची विल्हेवाट करण्यासाठी श्रद्धा डेव्हलपर्सने संजय राऊत यांना मदत केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांची पत्नी वर्षा आणि प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी यांच्या संयुक्त मालकीच्या अवनी इन्फ्रास्ट्रक्चरच्या कार्यालयाचीही ईडीने झडती घेतली आहे. श्रद्धा डेव्हलपर्सने पूर्व उपनगरात अनेक बांधकाम प्रकल्प केले आहेत. या प्रकल्पांसाठी श्रद्धा डेव्हलपर्सचा आर्थिक स्रोत काय, याचीही चौकशी ईडीकडून सुरू आहे.

ईडीने संजय राऊत यांच्यावर नेमके कोणते आरोप केले?

ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते असं ईडीने न्यायालयात सांगितलं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.