Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अनेक राज्यांत व्हिस्कीचे शॉर्टेज निर्माण होणार; सर्वात मोठ्या ब्रँडने विक्री बंद केली

 अनेक राज्यांत व्हिस्कीचे शॉर्टेज निर्माण होणार; सर्वात मोठ्या ब्रँडने विक्री बंद केली


भारतात येत्या काळात व्हिस्कीचे अनेक ब्रँडची विक्री बंद होण्याची शक्यता आहे. जॉनी वॉकर, मॅकडॉवेल, ब्लॅक डॉग, स्मिरनॉफ सारख्या व्हिस्की बनविणारी कंपनी डियाजियो पीएलसी ने या ब्रँडची विक्री बंद केली आहे. डियाजिओ कंपनीला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले आहे. यामुळे येत्या काळात या कंपनीच्या मद्याची टंचाई निर्माण होणार आहे.

डियाजिओच्या भारतातील प्रमुख हिना नागराजन यांनी याचे कारणही दिले आहे. महागाई वाढल्याने खर्च खूप वाढला आहे. भारत सरकारच्या नियमांमुळे आम्ही किंमतीही वाढवू शकत नाही आहोत. यामुळे प्रचंड नुकसान होत आहे, असे त्या म्हणाल्या. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत किंमतीचा वाद सोडविला जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. लांबचा विचार करता हा कंपनीसाठी योग्य निर्णय असल्याचे आपल्याला वाटतेय, असे त्या म्हणाल्या.

कंपनीला भारतात ९० लाख डॉलरचे नुकसान झाले आहे. यामुळे डियाजिओने भारतात काही ब्रँडची विक्री बंद केली आहे. कंपनीला सरकारने ठरवून दिलेल्या कमाल किंमतीमुळे मद्याचे दर वाढविता येत नाहीएत. असे असले तरी कंपनीचा हा निर्णय त्यांच्यासाठीच धोक्याचा असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. दारूच्या उत्पादनात दोन आकड्य़ांमध्ये वाढ झाली आहे. अशा स्थितीत विक्री थांबवल्यास कंपनीचे नुकसान होऊ शकते.

राज्या राज्यांमध्ये वेगवेगळे दर आहेत. परंतू पाच राज्यांशी चर्चा सुरु झाली आहे. हरियाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी आधीच किंमती वाढविल्या आहेत. यामुळे इतर राज्यांतही लवकरच मद्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.