गणेश मंडळांना प्रसाद तयार करताना आणि वाटताना
स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश प्रसाद तयार करून वाटप करणाऱ्या गणेश मंडळांना नोंदणी घेणे आवश्यक
सांगली दि. ३० : गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. गणेशोत्सवात गणपतीच्या आरतीनंतर प्रसाद वाटप होते. विषबाधेच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेबाबत काळजी घेण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे गणेशोत्सवातील प्रसाद सुरक्षित असेल याकडे अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष असणार आहे. प्रसाद तयार करून वाटप करणाऱ्या गणेश मंडळांना नोंदणी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी fssai.gov.in या संकेतस्थळावर जावून अर्ज करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.