सांगलीत पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी घेतला गणेशोत्सव तयारीचा आढावा
: महापालिका अधिकाऱ्यांकडून घेतली तयारीची माहिती
सांगली: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगलीचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी सांगलीच्या विसर्जन घाटावरील तयारीचा आढावा घेतला. यावेळी महापालिकेने केलेल्या तयारीची माहिती घेत विसर्जनासाठी लागणाऱ्या आवश्यक साधन सुविधा सज्ज ठेवण्याची सूचना टिके यांनी केली.
याचबरोबर विसर्जन घाटावर सुरक्षा बॅराकेर्टिंग करावे, विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत, नैसर्गिक विसर्जन घाटावर विद्युत व्यवस्था करावी यासह मनपाच्या बोटी लाईफ जॅकेटसह सज्ज ठेवाव्यात आदी सूचना अजित टिके यांनी यावेळी महापालिका प्रशासनाला केल्या. यावेळी पाणीपुरवठा अधीक्षक आप्पा अलकुडे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, उद्यान अधीक्षक गिरीश पाठक, कनिष्ठ अभियंता ऋतुराज यादव यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.