Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रत्येकी इतक्या कोटींची ऑफर होती - जेडीयू आमदारांचा आरोप

 प्रत्येकी इतक्या कोटींची ऑफर होती - जेडीयू आमदारांचा आरोप


पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पक्षाच्या नेत्यांसोबत घेतलेल्या बैठकीत अनेक धक्‍कादायक बाबींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि आता जनता दलातून बाहेर पडलेले नेते आरसीपी सिंह यांनी काही जणांशी संपर्क साधून पैशांची देवाण घेवाण करण्याबाबत चर्चा केली होती.

तसेच त्यांनी हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावरून केले असल्याचे काही आमदारांनी नितीश यांच्यासमोर सांगितले. आम्हाला प्रत्येकी 6 कोटी रूपयांची ऑफर देण्यात आली होती. भाजपने राज्यात आपल्याला केवळ अपमानित करण्याचेच काम केले. तसेच आपला पक्ष दुबळा करण्याचा प्रयत्न केला असा दावाही काही नेत्यांनी केला आहे.

नितीश कुमार यांच्या कोलांटउड्या

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला शॉक देत राष्ट्रीय जनता दलाचा हात धरला आहे. मात्र अशा कोलांट उड्या खाण्याची त्यांची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी पूर्वीही अनेक वेळा असे प्रकार केले आहेत.

2013 मध्ये भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केले होते. त्याचा निषेध म्हणून त्यावेळी अर्थात मोदींचा विरोध करत नितीश यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रामराम केला होता. संयुक्त जनता दल आणि भाजप यांची तब्बल 17 वर्षांची युती त्यांनी तेव्हा मोडली होती. 2015 मध्ये त्यांनी आपले जुने सहकारी लालूप्रसाद यादव यांच्याशी आघाडी केले. मात्र हे आघाडीचे सरकार केवळ 20 महिनेच चालले. नंतर राष्ट्रीय जनता दलाला रामराम करत त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा हात धरला व त्यानंतर पुन्हा रालोआला अर्थात भाजपला रामराम केला.

नितीश यांची वाटचाल:

1994 –

नितीश आणि लालू यांची मैत्री जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापासुनच्या काळाची. मात्र त्यांनी अचानक लालू यांची साथ सोडली आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत ते गेले. समता पार्टीची स्थापना केली. 1995 ची निवडणूक त्यांनी लालूंच्या विरोधात लढवली आणि त्यांचा दारूण पराभव झाला. त्यानंतर तो कोणाच्या तरी शोधात होते.

1996-

नव्या मित्राचा शोध घेताना त्यांनी भारतीय जनता पार्टीला जवळ केले. तेव्हा बिहारमध्ये भाजप अत्यंत दुबळा होता. समता पार्टी आणि भाजपची युती 17 वर्षे चालली. दरम्यानच्या काळात 2003 मध्ये समता पार्टीचे संयुक्त जनता दलात रूपांतर झाले. 2005 च्या विधानसभा निवडणुकीत जोरदार विजय झाल्यानंतर भाजप आणि जनता दल 2013 पर्यंत सोबत राहीले.

2013-

भाजपने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली आणि नितीश पुन्हा राष्ट्रीय जनता दलासोबत गेले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा दारूण पराभव झाला. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि जीतनराम मांझी यांच्याकडे सूत्रे सोपवली आणि 2015 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला ते लागले.

2015-

त्यांनी लालूंचा पक्ष आणि कॉंग्रेससोबत महाआघाडी स्थापन करत विधानसभेची निवडणूक लढवली. नितीश यांना कमी जागा मिळाल्या तरी त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले. लालूंच्या मुलाला तेजस्वी यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले.

2017- 20

महिन्यांनी दोन्ही पक्षांत कुरबुरी सुरू झाल्या आणि त्यांनी गंभीर वळण घेतले. त्यानंतर नितीश यांनी योजनाबध्दपणे राजीनामा दिला. तेव्हा भाजप हा विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष होता. मात्र भाजपने मध्यावधी निवडणुकांना नकार दिला आणि नितीश यांना पाठिंबा जाहीर केला. नितीश पुन्हा रालोआचे मुख्यमंत्री झाले. राज्यातील हे सत्तांतराचे नाटक केवळ 15 तासांत झाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.