Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरज तालुक्यातील शिपूर येथील गाजाच्या शेतावर छापा...

मिरज तालुक्यातील शिपूर येथील गाजाच्या शेतावर छापा...




मिरज : मिरज तालुक्यातील शिपूर येथे नंदकुमार दिनकर बाबर या शेतकर्‍याने चक्क ऊसाच्या शेतामध्येच गाजाचे अंतरपीक घेतले आहे. असून गांजाची जवळ जवळ पाचशे झाडे लावली आहेत. ती झाडे चार ते पाच फुट उंच आहेत. या झाडांची किंमत एक कोटी रूपयांची  असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नंदकुमार बाबर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उत्पादन शुल्क विभागाने ही मोठी कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे. भल्या पहाटेच हा छापासत्र सुरू  झाला. यामध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज, इस्लामपूर, जत, कवठेमहांकाळ विभागातील सर्व राज्य उत्पादन विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.


मिरज ग्रामीण भागातील नंदकुमार बाबर यांचे शिपुर-खंडेराजुरी रोड येथील पोटक्यानॉल जवळ एक एकर शेत आहे. एकरमध्ये मध्ये ऊसाचे पिक घेतले आहे. ऊसाच्या पिकांमध्येच आंतरपीक म्हणून त्याने चक्क गाजांच्या झाडांची लागवड केली आहे. जवळ  जवळ पाचशे झाडे लावली आहेत. ती झाडे पाच फूट उंच आहेत. शिपूरमध्ये ऊसाच्या शेतात गांजाची  लागवड केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागास मिळाल्यानंतर अतिशय गोपनियता बाळगून राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन टीम तयार करून पहाटे ५.३० वा सुमारास बाबर यांच्या शेतात छापा टाकला.

नंदकुमार बाबर हे मळ्यातच राहत असल्याने अधिकार्‍यांनी छापासत्र सुरू केल्यानंतर बाबर  हे अपंग असल्याने त्यांनी आपली तीनचाकी सायकलवर बसून बाहेर आले. ऊसाच्या शेतात अधिकारी गांजाची झाडे उपटून बाहेर आणत होती. पाचशेच्यावर गांजाची झाडे आहेत. दिवसभर ही कारवाई सुरूच होती. अंदाजे एक कोटीच्या घरात या गांजाच्या झाडाची किंमत होवू शकते. ऊसामध्ये ठरावीक अंतरावर ही गांजाची झाडे लावलेली होती. ऊसातून गाजाची झाडे उपटून आणण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टीमची दमछाक होत होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही गाजाची लागड प्रथमच मिरज तालुक्यात झाली आहे. तीन गुंठ्यामध्ये गाजाची रोपे ही तयार केलेली मिळाली आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकासह शिपूर गावचे पोलीस पाटील तसेच मिरज ग्रामीण पोलीस यांनी ही सहभाग घेतला आहे.राज्य उत्पादन शुल्कची टीम दिवसभर गांजाची झाडे उपटून ढीग मारून मोजदाद करीत होते. एवढ्या मोठ्या कारवाईमध्ये जिल्ह्याची टीम सहभागी झाली होती.


मिरज तालुक्यातील ऊसाच्या शेतात अंतरपीक म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाचे पिक घेण्याची  पध्दत पहिल्यांदाच आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड कशासाठी आणि कोणी करावयास लावली याची माहिती घेणे गरजेचे आहे. कारण शेती परवडत नाही म्हणून गांजाची लागवड आता शेतकरी केला असण्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.   अगोदरच शेती कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी असल्याने कर्ज कसे फेडायचे या विवेंचतनातून हा प्रकार घडला असण्याची शक्यताही आहे. तसेच मिरजेपासून काही किलोमीटरवर कर्नाटक हद्द सुरू होते. तेथेही मोठ्या प्रमाणात गांजा विकला जातो. तसेच मिरज हे गांजा तस्करीचे केंद्र आहे.  शहरातही गांजाची तस्करी होत असण्याची शक्यताही आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी हा मार्ग अवलंबिला जात आहे. चौकशीमध्ये अनेक सत्य बाहेर येणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.