महापालिका शाळांत रंगला तिरंग्यासोबत रक्षाबंधन सोहळा
सांगलीत महानगरपालिकेकडून हर घर तिरंगा अंतर्गत मनपा शाळांमध्ये तिरंग्यासोबत रक्षाबंधन पार पडले. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उयायुक्त राहुल रोकडे यांच्या नियोजनानुसार मनपा शाळांमध्ये तिरंग्यासोबत रक्षाबंधन पार पडले. यामध्ये महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये रक्षाबंधन साजरे करताना तिरंगा ध्वज आणि याबरोबर भारत माता की जय आशा घोषणांनी महापालिका शाळांचे रक्षाबंधन उत्साहात करण्यात आले. या रक्षाबंधन कार्यक्रमात शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सक्रिय सहभाग घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.