Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली महापालिका उभारणार अत्याधुनिक दर्जाचे स्केटींग ट्रॅक

सांगली महापालिका उभारणार अत्याधुनिक दर्जाचे स्केटींग ट्रॅक


सांगली महापालिका उभारणार अत्याधुनिक दर्जाचे स्केटींग ट्रॅक : 60 लाखाची तरतूद : महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांची घोषणा : महापालिकेकडून तिरंगा चषक स्केटींग स्पर्धा उत्साहात संपन्न


सांगली: स्केटींग खेळाकडे खेळाडूंचा वाढता ओढा लक्षात घेता सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सांगलीत अत्याधुनिक दर्जाचा स्केटींग ट्रॅक उभारणार असल्याची घोषणा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केली. यासाठी 60 लाखाची तरतूद करण्यात आल्याचेही महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत महापालिकेकडून क्रीडा संकुल येथे तिरंगा चषक स्केटींग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर सुर्यवंशी बोलत होते. कार्यक्रमास आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, चंद्रकांत आडके, क्रीडाधिकारी महेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांच्याहस्ते तिरंगा चषक स्केटींग स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. 



यावेळी स्केटींग मार्गदर्शक सुरज शिंदे आणि प्रशिक्षक उपस्थित होते. यावेळी बोलताना महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी स्केटींगकडे वाढता ओढा लक्षात घेता आणि सांगलीत स्केटींग ट्रॅक उपलब्ध नसल्याने खेळाडूंची होणारी गैरसोय लक्षात घेता महापालिकेने स्केटींगला प्रोत्साहन देण्यासाठी अत्याधुनिक सुविधा असणारा स्केटींग ट्रॅक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हनुमान नगर येथील ऑक्सिडेशन पौंड च्या जागेत 60 लाख रुपये खर्चून हा अत्याधुनिक स्केटींग ट्रॅक उभारला जाणार असून यामुळे आपल्या महापालिका क्षेत्रातील स्केटींग पटून आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी परराज्यात किंवा अन्य जिल्ह्यात जावे लागणार नाही असेही त्यांनी सांगितले. आयुक्त सुनील पवार यांनी स्केटींग स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊन आपले शरीर फिट ठेवण्याचा सल्ला दिला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.