Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मनपाआयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडून सर्व विभागांचा आढावा

 मनपाआयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडून सर्व विभागांचा आढावा


: प्रलंबित कामे मार्गी लावणेचे दिले आदेश : आता दर सोमवारी होणार अधिकाऱ्याची आढावा बैठक: मंजूर कोणतीही फाईल प्रलंबित ठेऊ नका: आयुक्त कापडणीस यांचे सर्व विभागाना आदेश

सांगली:  मनपाआयुक्त नितीन कापडणीस यांनी आज  सर्व विभागांचा आढावा घेतला. यावेळी विभागवार आढावा घेत प्रलंबित कामे मार्गी लावणेचे आदेशही कापडणीस यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच दर सोमवारी अधिकाऱ्याची कामाबाबतची आढावा बैठक घेणेत येईल असेही आयुक्त कापडणीस यांनी सांगितले. तसेच मंजूर असणारी कोणतीही फाईल प्रलंबित ठेऊ नका अशा सूचनाही आयुक्त कापडणीस यांनी सर्व विभागाच्या प्रमुखांना दिल्या आहेत.

   आज महापालिकेत आयुक्त नितीन कापडणीस यांनी सर्व विभागांच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त  चंद्रकांत आडके उपस्थित होते. यावेळी आयुक्त कापडणीस यांनी विभाग निहाय झालेल्या कामांचा आणि प्रलंबित तसेच प्रस्तावित कामांचा आढावा घेतला. यामध्ये सांगली मिरजेच्या काळी खणमध्ये बोटिंग, मॉडेल स्कुल, स्मार्ट हजेरी शेड यासह अनेक महत्वकांक्षी प्रकल्पाच्या कामांची आणि सध्यस्थीतीची माहिती घेतली. तसेच जी कामे तांत्रिक बाबींमुळे अपूर्ण आहेत ती तातडीने मार्गी लावा तसेच कोणतेही काम किंवा मंजूर कोणतीही फाईल प्रलंबित ठेऊन नका असा सूचनाही आयुक्त कापडणीस यांनी सर्वच खाते प्रमुखांना केल्या आहेत. तसेच आता दर सोमवारी अधिकाऱ्याची आढावा बैठक घेण्याबाबतही आयुक्त कापडणीस यांनी प्रशासनाला सूचित केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.