आमदार जयंत असगावकर यांच्या फंडातून सांगली जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना मल्टीफंक्शनल प्रिंटरचे वितरण
तसेच सांगली जिल्हा शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा.पृथ्वीराज पाटील यांनी सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थिती व इतर सामाजिक कार्याबाबत प्रशंसा करून भविष्यामध्ये त्यांच्या पाठीशी राहण्याचे सर्वांना आवाहन केले. आमदार जयंत असगावकर यांनी पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये आमदार फंडा बरोबरच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शाळांना विविध शैक्षणिक साधने पुरवणार असल्याचे सांगितले तसेच विनाअनुदानित, अनुदानित शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्याबाबत सर्व शिक्षक व पदवीधर आमदारांना सोबत घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
मा.पृथ्वीराज पाटील यांनी आ. जयंत आसगावकर यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्न संदर्भात शालेय शिक्षणमंत्री व इतर विभागांमध्ये केलेल्या कामाची प्रशंसा करून त्यांच्या विद्यार्थी गुणवत्ता विकास व सहशालेय उपक्रमास सक्रिय पाठिंबा दिला. याप्रसंगी शिक्षक काँग्रेस राज्य कार्याध्यक्ष प्रा. एन. डी .बिरनाळे यांनी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास मा. राजेंद्र नागरगोजे, प्रा .राजेश रोमन, जिल्हा परिषद सदस्य श्री.संजय पाटील ,प्रा .चांदुरकर सांगली जिल्ह्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक श्री .जे .एस. पाटील यांनी मानले व सूत्रसंचालन प्रा. सचिन पाटील यांनी केले
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.