कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, AIIMS मध्ये ठेवण्यात आलं व्हेंटिलेटरवर
सगळ्यांना खळखळून हसवणारे दिग्गज कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना बुधवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आला. सकाळी जीममध्ये वर्कआऊट करत असताना ते ट्रेडमिलवरच कोसळले. त्यानंतर त्यांना ताबडतोब रूग्णालयात दाखल करण्यात आलं. दिल्लीच्या एम्स रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांना एम्समध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं सुरूवातीला त्यांना इमर्जन्सी मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. परंतु नंतर त्यांना सीसीयूमध्ये हलवण्यात आलं.
जीममध्ये ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू श्रीवास्तव बेशुद्ध झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची एन्जिओग्राफी करण्यात आली मात्र एंन्जिओग्राफी नंतरही ते बेशुद्धच असल्याची माहिती समोर आली होती. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार एन्जिओग्राफिमध्ये एका ठिकाणी १०० टक्के ब्लॉक सापडल्याचं सांगण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.