Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हिंंदू एकता आंदोलनचे संस्थापक नारायणराव कदम यांचा आज 81 वा वाढदिवस.

हिंंदू एकता आंदोलनचे संस्थापक नारायणराव कदम यांचा आज 81 वा वाढदिवस.


पत्रकार असल्यानं स्टेशन चौकात, आंदोलनाच्या ठिकाणी अनेकदा त्यांची भाषणं ऐकली. तोच त्वेष, तोच जोर. तीच भाषा, तीच जरब. प्रतापगडावरील अतिक्रमणांबाबतही त्यांनी त्यांची भूमिका घेतली होती. देवदासी प्रथा अंतर्गत जटा निर्मूलन, हिंदू - शिकलगार समाजाचं शुद्धीकरण, अरब हटाव-मिरज बचाव मोहीम, समान नागरी कायदा यासाठी त्यांनी आंदोलनं उभी केली. लढत राहिले. 

सांगलीत चार दिवसाची शिवजयंती सुरू करण्याचं श्रेयही नारायणरावांचंच आहे. नारायणराव हिंदुत्ववादी कार्यकर्ते, पण त्यांच्या मनात हिंदुत्वाची व्याख्या अगदी ठाम होती. समाजकारणात राजकारण आणलं नाही आणि अर्थकारण तर नाहीच नाही. शेकडो लोकांना न्याय मिळवून दिला, पण आपल्या पोटच्या मुलांसाठी कधी वशिला लावला नाही की शब्द टाकला नाही. राजकारणात सहज मोठी पदं मिळाली असती, पण तत्वांना मुरड घातली नाही.

या नारायणरावांची दुसरी बाजू तितकीच हळवी, भावनाशिल आहे. वारकरी घराण्याची परंपरा जपणार्या नारायणरावांनी पंढरीची वारी कधी चुकवली नाही. रस्त्यावर उतरून आंदोलन करता करता रंगभूमीही गाजवली. अनेक नाटकात स्त्री भूमिका सादर केल्या. चाहत्यांची वाहवा मिळवली. 

नारायणरावांचं हे चौफेर, झंझावाती आणि हळवं आयुष्य थोडक्यात का होईना पण समाजासमोर यावं. नव्या पिढीला नेमकं हिंदुत्व समजावं यासाठी त्यांची मुलगी राणी यांनी त्यांची बायोग्राफी प्रसिद्ध करायचा निर्णय घेतला. नंतर तो निर्धारच झाला. मुलगा बिपीननं सहकार्य केलं. माईंनीही खूप आठवणी सांगितल्या. विजय कडणे यांनी त्या काळातल्या बर्याच घटना पुन्हा ताज्या केल्या..आणि या सार्यांच्यामुळं मी त्यांची बायोग्राफी लिहू शकलो. लवकरच हे पुस्तक तुमच्या हाती असेल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.