Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सोन्याच्या खाणीजवळ चित्रिकरणासाठी गेलेल्या 8 मॉडेल्सवर सामूहिक बलात्कार

 सोन्याच्या खाणीजवळ चित्रिकरणासाठी गेलेल्या 8 मॉडेल्सवर सामूहिक बलात्कार


दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. बेकायदेशीर सोन्याच्या खाणीजवळ  चित्रिकरण करण्यासाठी गेलेल्या आठ मॉडेल्सवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. एका गँगने त्यांना पकडले आणि बंदुकीच्या धाकावर त्यांच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. यामुळे आफ्रिकेतील लोक रस्त्यावर उतरले असून या प्रकरणी आतापर्यंत 80 हून अधिक लोकांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

जोहान्सबर्ग जवळच्या क्रुगर्सडॉर्पमध्ये 28 जुलै रोजी एक प्रोडक्शन टीम जंगलामध्ये चित्रिकरणासाठी गेली होती. त्यांच्यासोबत 19 ते 37 वयोगटातील काही मॉडेल्सही होत्या. सोन्याच्या खाणीजवळ म्यूझीक व्हिडीओ चित्रिकरण करताना सोन्याची तस्करी, उत्खनन करणाऱ्या गँगने त्यांना पकडले. त्यांच्याकडून चित्रिकरणाचे साहित्यही काढून घेतले आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला.

दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आफ्रिकेतील जनता रस्त्यावर उतरली आहे. आमच्या महिला बलात्कार करण्यासाठी आणि मारण्यासाठी जनावर नसल्याचे लोकांनी म्हटले. यावेळी क्रुगर्सडॉर्प मॅजिस्ट्रेट न्यायालयाच्या बाहेर लोकांनी निदर्शनेही केली. सदर घटना उघडकीस आल्यानंतर गृहमंत्री भेकी सेले यांनी ही घटना लाजिरवाणी असल्याचे म्हटले. या घटनेमागे खाणीमध्ये काम करणाऱ्या बेकायदा घुसलेल्या परप्रातियांचा हात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आतापर्यंत 84 जणांना अटक करण्यात आली आहे.

दोन आरोपी चकमकीत ठार

सोन्याच्या खाणीजवळ म्यूझीक व्हिडीओ चित्रिकरण करणाऱ्यांचा आवाज ऐकून गँगचे सदस्य तिथे आले होते. 12 महिला आणि 10 पुरुष यावेळी तिथे उपस्थित होते. गँग पोहोचल्यावर मॉडेल्सने पळण्याचा प्रयत्न केला, परंतु गोळीबार झाल्याने त्या पकडल्या गेल्या. त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. याच दरम्यान गँगने त्यांचे साहित्य लुटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस पोहोचले आणि दोन्ही बाजूने गोळीबार झाला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन आरोपी ठार झाले असून एक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.