महापालिकेच्या कार्यशाळेत 70 जणांनी बनवल्या शाडूच्या गणेशमूर्ती
: आमराईत शाडूच्या गणेशमूर्ती तयार करण्याच्या उपक्रमास मोठा प्रतिसाद : येणारा गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि हरित साजरा करावा : आयुक्त सुनील पवार यांचे जनतेला आवाहन
सांगली : माझी वसुंधरा आणि स्वच्छ सर्व्हेक्षण 2022 अंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्यावतीने आयोजित शाडूपासून गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेत 70 जणांनी शाडूच्या गणेशमूर्ती बनवल्या. आमराईत शाडूच्या गणेशमूर्ती तयार करण्याच्या महापालिकेच्या उपक्रमास जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, येणारा गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि हरित उत्सव म्हणून साजरा करावा असे आवाहन मनपाआयुक्त सुनील पवार यांनी मनपाक्षेत्रातील जनतेला केले.
माझी वसुंधरा अंतर्गत आमराईत आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या सूचनेनुसार शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत 100 हुन अधिक सांगलीकरानी सहभाग घेतला. यावेळी महापालिकेडून पुरवण्यात आलेल्या शाडूच्या मातीपासून कार्यशाळेत सहभागी झालेल्यापैकी 70 जणांनी पर्यावरण पूरक गणेशमूर्ती तयार केल्या. यासाठी मूर्तिकार वंदना सेवलकर यांनी सर्वाना गणेशमूर्ती बनवण्याबाबत मार्गदर्शन करीत सर्वाना मूर्ती करण्याचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह दिले. यावेळी महापालिकेचे आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, ब्रँड अंबेसिडर दीपक चव्हाण, स्वच्छ सर्व्हेक्षण विभागाच्या शहर समन्वयक अधिकारी वर्षाराणी चव्हाण , शिवम शिंदे यांच्यासह मनपाची टीम उपस्थित होती. यावेळी सर्वानी सुरेख आणि पर्यावरण पूरक गणेशमूर्ती तयार करून त्याची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेत पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी सर्वानी यंदाच्या गणेशोत्सवात शाडूच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे असे आवाहन यावेळी सहभागी नागरिकांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.