Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिकेच्या रोजगार मेळाव्यात मिळाला 285 जणांना रोजगार

महापालिकेच्या रोजगार मेळाव्यात मिळाला 285 जणांना रोजगार 


: 356 उमेदवारांना फेर मुलाखतीसाठी  बोलावणे : 2650 उमेदवारांनी केली नोंदणी


सांगली : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका व दिन दयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान व क्यूजेपीआर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट येथे पार पडलेल्या रोजगार मेळाव्यात 285 उमेदवारांना रोजगार मिळाला आहे तर 356 उमेदवारांना कागदपत्रे पुर्ततेसाठी पुन्हा बोलावण्यात आले आहे. दोन वर्षानंतर भरलेल्या रोजगार मेळाव्यात 2650 हुन अधिक उमेदवारांनी रोजगारासाठी नोंदणी केली होती.


या रोजगार मेळाव्याचे उदघाटन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, सभागृह नेते विनायक सिंहासने , उपायुक्त चंद्रकांत आडके यांची प्रमुख उपस्थिती होती. या रोजगार मेळाव्यात एकूण 71 नामांकित कंपन्यांचा सहभाग होता. या रोजगार मेळाव्यास एकूण 2650 लाभार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले तसेच 1060 लाभार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली . यामधून 285 उमेदवारांची निवड करण्यात आली तर फेर मुलाखतीकरिता 356 उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्याचे नियोजन मतीन अमीन, ज्योती सरवदे, किरण पाटील, सदाशिव हंकारे, समूव्ह संघटिका वंदना सव्वाखंडे, शाहीन शेख , संपदा मोरे , क्यूजेपीआर ग्रुपचे मारुती गायकवाड आणि विवेक चव्हाण आदींनी केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.