Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नोटांची भिंतच जणू! 260 अधिकारी, 120 वाहनं अन् 390 कोटी! 13 तास मोजणी, जालन्यात खळबळ

नोटांची भिंतच जणू! 260 अधिकारी, 120 वाहनं अन् 390 कोटी! 13 तास मोजणी, जालन्यात खळबळ


जालना ता.११: जालना येथील स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरं, कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केली. विभागाने केलेल्या या छाप्यांमध्ये सुमारे 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे.त्यात 58 कोटींची रोकड, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा 16 कोटींचा ऐवज जप्त करण्यात आलाय.विशेष म्हणजे ही रोकड मोजण्यासाठी तब्बल 13 तास लागले.

१ ते ८ ऑगस्ट अशा आठ दिवस चाललेल्या कारवाईत राज्यभरातले 260 अधिकारी, कर्मचारी 120 वाहनांतून जालन्यात पोहोचले होते. कारवाईत सापडलेली 58 कोटींची रोकड 35 कापडी पिशव्यांत पॅक करण्यात आली तेव्हा नोंटांच्या बंडलांच्या भिंतीच उभ्या राहिल्या.

कपाटांखाली, बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड सापडली. सर्वत्र नोटांची बंडलेच बंडले आढळली. स्टील व्यावसायिकांपैकी तिघांकडे रोख रकमेसह सोन्याचे दागिने, बिस्किटे, नाणी, हिरे मिळाले.सोन्याच्या 32 किलो दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत 16 कोटी रुपये आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.