Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली: येथील प्रभाग क्रमांक दहामधील बंद पडलेल्या शाळा क्रमांक 26 मध्ये अंगणवाडी सुरू करण्यात आली.

सांगली: येथील प्रभाग क्रमांक दहामधील बंद पडलेल्या शाळा क्रमांक 26 मध्ये अंगणवाडी सुरू करण्यात आली.


सांगली: येथील प्रभाग क्रमांक दहामधील बंद पडलेल्या शाळा क्रमांक 26 मध्ये अंगणवाडी सुरू करण्यात आली. आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते गुरूवारी या अंगणवाडीचा शुभारंभ करण्यात आला. बालकांच्या गर्दीने बंद पडलेली शाळा पुन्हा फुलली. बालकांचे शिक्षण महत्वाचे आहे. चांगले शिक्षण मिळण्यासाठी काही कामे बाजुला ठेवून बालकांच्या शिक्षणावर भर दिला जाणार असल्याचे आयुक्त सुनिल पवार यांनी सांगितले.

येथील मनपाची शाळा क्रमांक 26 गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती. या ठिकाणी मद्यपी, जुगार इतर अवैध व्यवसाय चालत होते. महापालिकेच्या मालकीच्या जागेचा दुरूपयोग होत होता. शिवाय या भागातील अंगणवाडी भाड्याच्या जागेत सुरू होती. या ठिकाणी जागा देखील कमी होती. लहान मुलांचे शिक्षण, खेळण्यासाठी जागा, आरोग्य तपासणी, लसीकरण, महिलांना आहार, आरोग्य प्रशिक्षण आदींसाठी ही जागा अपुरी होती. त्यामुळे या भागातील नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी शाळा क्रमांक 26 मध्ये अंगणवाडी सुरू करण्याची मागणी तत्कालिन आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे फेबु्रवारी 2021 मध्ये केली होती. 


बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी देखील जागेची मागणी केली होती. त्यामुळे तत्कालिन आयुक्तांनी या शाळेतील चार खोल्यांमध्ये अंगणवाडी क्रमांक 9, 12, 13 व 14 सुरू करण्यास मान्यता दिली, त्याचा शुभारंभ आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते करण्यात आला. आयुक्त पवार म्हणाले, गोरगरिब लोकांसाठी महापालिकेच्या अंगणवाड्या आहेत. खासगी शाळांच्या तुलनेत महापालिकेच्या शाळांचा दर्जा आता वाढत आहे. पटसंख्या देखील वाढत चालली आहे. अनेक पालकांचा ओढा आता महापालिकेच्या शाळांमध्ये दिसत आहे. बालकांना शिक्षण महत्वाचे आहे. लहानपणीच चांगले शिक्षण मिळणे आवश्यक आहे. चांगल्या वातावरणात मुले शिकली की प्रगत होतात, भवितव्य उज्वल बनते. 

त्यामुळे महापालिकेचा आयुक्त म्हणून काम करताना शिक्षणावर अधिक भर दिला जाणार आहे. अधिकाधिक निधी शिक्षणावर खर्च केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने, नगरसेविका वर्षा निंबाळकर, अनारकली कुरणे, जमीर कुरणे, अमर निंबाळकर, प्रफुल्ल ठोकळे, गीता पवार, पर्यवेक्षिका ज्योती बोराडे, सेविका उषा कांबळे, शोभा कोल्हे, भारती गुड्डी, प्रभा पावसकर, राणी गाडे, रूपाली गोरे, उज्वला देसाई, सरिता गुड्डी, संतोष कलकुटगी, गणेश वडर, महेश वडर, शेखर कलकुटगी, सतिश कलकुटगी, निलेश वडर, मोहन गुंजी, राहुल कलकुटगी, वरुण खुंटे, किरण साळुंखे, गणेश कलकुटगी, लक्ष्मण वडर, आकाश शिंदे, विकी नाईक, राहुल माने, संदिप वडर, राहुल वडर, धनंजय वडर, विनायक नाईक, रोहीत पवार आदी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.