Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गणेशोत्सवासाठी महापालिकेचे 1200 कर्मचारी नियुक्त

गणेशोत्सवासाठी महापालिकेचे 1200 कर्मचारी नियुक्त 


: उत्सवकाळात दोन सत्रात स्वच्छता केली जाणार : मनपा आयुक्त सुनील पवार यांची माहिती


सांगली: गणेशोत्सवासाठी महापालिकेचे 1200 स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्यात आली आहे गणेशउत्सवकाळात दोन सत्रात स्वच्छता केली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त सुनील पवार यांनी दिली.  यावेळी आयुक्त सुनील पवार म्हणाले की, यंदा पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी स्वच्छता विभागाने उत्सव काळातील स्वच्छता , निर्माल्य संकलन आणि मूर्तीदान यासाठी एकूण 1200 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांच्या नियंत्रणाखाली 2 आरोग्यधिकारी, 4 वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक 21, मुकदम 50 आणि 1047 स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश आहे.

याचबरोबर स्वच्छतेसाठी घंटागाडीसह 70 वाहने तैनात असणार आहेत. उत्सव काळात रस्त्यावरील कचरा हा दोन टप्यात उचलण्यात येणार असून सार्वजनिक स्वच्छतगृहे सुद्धा दोनवेळा स्वच्छ केली जाणार आहेत. उत्सव काळात सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरात स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले असून नागरिकांनी यंदाचा गणेशोत्सव हरित आणि पर्यावरनपूरक साजरा करा. निर्माल्य मनपाच्या निर्माल्य कुंडात टाकावे, जास्तीजास्त मूर्तीदान करावे असे आवाहनही मनपा आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.