Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे जिल्हास्तरीय सादरीकरण 12 व 13 सप्टेंबरला

महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे जिल्हास्तरीय सादरीकरण 12 व 13 सप्टेंबरला


नवउद्योजक व आस्थापनांना 12 सप्टेंबर पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

सांगली, दि. 23,  : नाविन्यता संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे जिल्ह्यातील विविध तालुक्यात दि. 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे दि. 25 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 ते 10 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय सादरीकरण दिनांक 12 व 13 सप्टेंबर रोजी वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज, सांगली येथे सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे. सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवउद्योजकांनी / आस्थापनांनी www.msins.in या संकेतस्थळावर दि. 12 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.

महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे सांगली जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय आयोजन पुढीलप्रमाणे. दि. 22 ऑगस्ट  रोजी  विटा व आटपाडी, दि. 24 ऑगस्ट पलूस, कुंडल व तासगाव, दि. 25 ऑगस्ट सांगली, मिरज व कवठेमहांकाळ, दिनांक 26 ऑगस्ट जत, दि. 02 सप्टेंबर शिराळा, पेठ, इस्लामपूर व आष्टा, दि. 03 सप्टेंबर  रोजी कडेगांव व हिंगणगाव. 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८ जाहीर करण्यांत आले आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्ट-अपच्या विकासाकरिता पोषक वातावरण निर्मिती करुन त्यातून यशस्वी उद्योजक घडविण्याकरिता इनम्युबेटर्सची स्थापना व विस्तार, गुणवत्ता परीक्षण व स्टार्टअप्सना बौध्दिक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय्य, ग्रॅड चॅलेंज, स्टार्टअप वीक यांसारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याअंतर्गत जिल्ह्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेची महाराष्ट्राच्या तळागाळातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, नवसंकल्पनांना तसेच सुरुवातीच्या टप्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे, राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे अशी वैशिष्ट्ये आहेत. या यात्रेचे प्रामुख्याने ३ टप्पे आहेत. त्यामध्ये तालुकास्तरीय प्रचार प्रसिध्दी व जनजागृती अभियान, प्रत्येक तालुक्यातील लोक समुह एकत्रित होण्याच्या जागेवर स्टार्टअप यात्रेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी एक वाहन याबाबतची संपूर्ण माहिती, नाविन्यपूर्ण संकल्पना व त्याचे इतर पैलू तसेच विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती देईल.

जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्रामध्ये सर्व तालुक्यांत प्रचार प्रसिध्दी झाल्यानंतर, राज्यातील सर्व जिल्ह्यांत एकदिवशीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्रांचे आयोजन केले जाईल. प्रशिक्षण शिबिरात नाविन्यता तथा उद्योजकतेबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजकांची व्याख्याने, तज्ज्ञ मार्गदर्शक व सल्लागारांची सत्रे, तसेच नोंदणी केलेल्या नवउद्योजकांचे संकल्पना सादरीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.